संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी
चांदेकसारे -राज्याचे मुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा शरद पवार यांच्या कडे केली पत्राद्वारे मागणी.
कोपरगांव चे लोकप्रिय आमदार व समृध्द कोपरगांव चे स्वप्न बघणारे व त्या प्रमाणे अहोरात्र कष्ट घेणारे आमदार श्री आशुतोष दादा काळे यांची श्री साई बाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था या न्यासाचे अध्यक्ष पदी नियुक्ती करावी अशी मागणी जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कूल चे सचिव व आमदार आशुतोष दादा काळे यांचे कट्टर समर्थक श्री सुनिल भास्करराव होन यांनी केली आहे.
आमदार आशुतोष दादा काळे यांनी तालुक्याचा प्रत्येक प्रश्न मनापासून सोडविण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच दादांच्या शिक्षणाचा, अनुभवाचा फायदा निश्चित साई बाबा संस्थानला होईल तसेच साई बाबा संस्थान मध्ये पारदर्शकता येईल, व भक्तांना सर्व सुख- साेई उपलब्ध होईल व संस्थान चे नावलौकिकात भर पडेल यात काही शंका नाही.
गावकऱ्यांच्या, भक्तांच्या हिताची जपवणूक होणे गरजेचे आहे. आमदार आशुतोष दादा काळे हे स्थानिक रहिवासी असल्याने दादांना येथील समस्या, अडचणी, सुविधा या सर्वांची माहिती आहे. त्यामुळे संस्थानच्या कारभारात पारदर्शकता येईल व भक्तांचा विश्वस्तव्यवस्थेवरिल विश्वास वाढेल व साईबाबांचा श्रध्दा व सबुरी चा संदेश जगभरात प्रभावी पणे आमदार आशुतोष दादा काळे पोहचवतील असा विश्वास सुनिल होन यांनी व्यक्त केला.
सुनिल होन यांनी त्याकरिता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री शरदरावजी पवार साहेब,उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब यांना पत्र लिहून वरिल मागणी केली आहे.