गोपाळवाडी गावच्या सरपंच पदी कुल गटाच्या लक्ष्मी राजकुमार होले यांची निवड तर उपसरपंच सूरज भुजबळ या नवीन चेहऱ्याला संधी


गोपाळवाडी गावच्या सरपंच पदी कुल गटाच्या लक्ष्मी राजकुमार होले यांची निवड तर उपसरपंच सूरज भुजबळ या नवीन चेहऱ्याला संधी

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

गोपाळवाडी गावच्या सरपंच पदी कुल गटाच्या लक्ष्मी राजकुमार होले यांची निवड तर उपसरपंच सूरज भुजबळ या नवीन चेहऱ्याला संधी मिळाली आहे, निवडणूक निर्णय अधिकारी एन डी जरांडे, तलाठी वंजारी मॅम,ग्रामसेवका लामकाने यांच्या निवडणूक शांततेत पार पडली, कुल गटाकडून लक्ष्मी राजकुमार होले यांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केला होता, उपसरपंच पदासाठी सूरज दादा भुजबळ यांचा अर्ज होता तर थोरात गटाकडून सरपंच पदासाठी मनिषा सुरेश होले तर उपसरपंच पदासाठी रोहन गारुडी यांनी अर्ज दाखल केले होते,  अशी सरळ लढत होती त्यामध्ये 8 विरुद्ध 7 मतांनी सरपंच म्हणून लक्ष्मी होले यांची तर सूरज भुजबळ यांची उपसरपंच पदी नियुक्ती झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी जरांडे यांनी जाहीर केले, ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल होले आणि पोलीस पाटील वर्षा लोणकर यांनी प्रयत्न केले होते,काही लोकांच्या अडमुठपणा मुळे बिनविरोध होऊ शकली नाही, आणि त्यामुळे जनतेनेच ही निवडणूक हाती घेतल्या मुळे या निवडणुकीत 15 पैकी 11  नवीन चेहरे निवडूनदिले  आहेत, प्रवीण होले यांच्या आई या अगोदर सदस्य होत्या, जयसिग दरेकर यांच्या पत्नी सदस्य होत्या, माजी सरपंच वैशाली शिंदे आणि माजी उपसरपंच सीमा बोरावके यांना जनतेने पुन्हा संधी दिली आहे,बाकी 11 चेहरे नवीन ग्रामपंचायत कारभार पहाणार आहेत, वार्ड निहाय  उमेदवार वार्ड क्र 1) सूरज भुजबळ, सिमा बोरावके,निता गिरमे, वार्ड क्र 2)जयसिंग दरेकर, प्रविण होले,स्वाती पवार,वार्ड क्र3)शरद होले,प्रकाश गिरमे, लक्ष्मी होले, वार्ड क्र 4) विजया सूळ,मनिषा होले,वैशाली शिंदे,वार्ड क्र 5) मनिषा भोसले ,रोहिणी शिंदे,तर एक अपक्ष रोहन गारुडी,असे निवडून आले आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News