कोपरगाव तालुका पोलिसांकडुनरस्ता अडवून पैसे व मोबाईल जबरीने चोरून नेणार्या टोळीचा पर्दाफास !!दोघांना अटक


कोपरगाव तालुका पोलिसांकडुनरस्ता अडवून पैसे व मोबाईल जबरीने चोरून नेणार्या टोळीचा पर्दाफास !!दोघांना अटक

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.
कोपरगाव तालुका पोलीसांनी उल्लेखनिय कामगिरी करत रस्ता अडवून पैसे व मोबाईल जबरीने चोरून नेणार्या टोळीचा पर्दापास करुन दोन जणांना अटक केली आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की,श्री .भाऊसाहेब धर्मा होन वय ५३ वर्षे रा.चांदेकसारे ता.कोपरगाव जि.अहमदनगर यांनी फिर्याद दिली की,त्यांना दि.१/१/२०२१ रोजी रात्री.२०:१५ वाजता आहेर वस्ती साईमंगम.कार्यालयाजवळ सावळीविहीर ते झगडे फाटा रोड येथे तीन ते चार अनोळखी चोरट्यांनी त्यांच्या मोटार सायकलला त्यांच्या कडील पांढर्या रंगाची गाडी  आडवी लावून त्यातील तीघेजण खाली उतरून त्यांच्या कडील मोटार सायकलची चावी काढुन घेवुन त्यांच्याकडील मोबाईल व रोख ऎवज ६२०० रुपये बळजबरीनं चोरून नेला होता त्यांच्या फिर्यादीवरुन कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनला दि.२/१/२०२१ रोजी गुन्हा नं ३/२०२१भां.द.वि.कलम ३९२,३४ प्रमाणे दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हाचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाखाली तपास सुरु होता. दि.४/२/२०२१ रोजी कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरक्षक श्री.दौलत जाधव यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणावरुन तसेच गोपिनय माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा आरोपी आरिप अमिन सय्यद वय १९ वर्षे रा.देशमुख चारी, शिर्डी. ता.राहता याने त्याच्या साथीदारासह केला असल्याची माहिती मिळाली.त्यांच्या सूचनेप्रमाणे पो.स.इ.श्री सचिन इंगळे पो.ह.को.इरफान शेख,अबादास वाघ, जयदिप गवारे,यांनी संशयीत आरोपी आरिफ अमिन सय्यद यास ताब्यात घेतले.त्यांच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पैसे व मोबाईल बाबत पोलिसी खाक्या दाखवून विचारपुरस केली असता गुन्ह्याची  कबुली दिली आहे.सदर गुन्ह्यात वैभव संधन रा.रुई ता.राहता याच्याकडील इन्होवा कार व सोबत दोन अल्पवयीन मुले असल्याचे सांगितले सदर गुन्हातील मोबाईल बाबत विचारणा केली असता हा मोबाईल अजय विजय काळे रा.पुणतांबा ता.राहता यांना विक्री केला असल्याचे सांगितले. दि.८/२/२०२१ रोजी रात्री २१;३० वा.चोरीचा मोबाईल विकत घेणारा आरोपी अजय विजय काळे यास अटक करुन त्याच्या कडून काळ्या रंगाचा सँमसंग कंपनीचा गँलक्सी एम.१० मोबाईल हस्तगत केला आहे.सदरची कौतुकास्पद कामगिरी पोलिस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक सौ दिपाली काळे.उपविभागीय अधिकारी संजय सातव साहेब,यांच्या मार्गदशनाखाली कोपरगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक दौलतराव जाधव पोसइ सचिन इंगळे,पोहको इरफान शेख,पोलिस काँन्सटेबल जगदिप गवारे,अंबादास वाघ व सायबर सेल कार्यालय,श्रीरामपुर येथील पोना.फुरबान शेख,पो.काँ.प्रमोद जाधव यांनी केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News