धान्य पकडले असल्याचे तहसीलदार अर्चना पागिरे यांनी सागिंतले.


धान्य पकडले असल्याचे तहसीलदार अर्चना पागिरे यांनी सागिंतले.

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण:

तालुक्यातील अमरापुर येथे एक ट्रक शासकीय धान्य काळ्या बाजारात विक्रीला जात असताणा पकडले आहे. अमरापुर ग्रामस्थांच्या सतर्कतेने हे धान्य पकडले गेले असुन प्रभारी पुरवठा निरीक्षक यांनी याचा पंचनामा केला आहे.

      स्वस्त धान्य दुकानातील साठवलेले शासनाचे गहू व तांदुळ धान्य एम.एच.१६ ए.ई.३३४५ या आयशर ट्रकमधुन काळ्या बाजारात विक्रीला जात असताणा अमरापुर गावाजवळ सोमवार दि. ८ रोजी दुपारी पाच वाजण्याच्या दरम्यान पकडण्यात आले.या ट्रकमधे ६० गोण्या तांदुळ व १०० गोण्या गहू असे जवळपास ८० क्विंटल शासकीय धान्य विक्रीला जात होते. सदर धान्यांने भरलेला ट्रक अमरापुर जवळील पाण्याच्या टाकीपुढे रस्त्यावर उभा होता त्याचा संशय आल्याने विचारपुसअंती सतर्कतेने हे धान्य पकडले गेले.

       तहसील कार्यालयास याची माहिती दिल्यानंतर नायब तहसीलदार व्हि.के.जोशी व प्रभारी पुरवठा निरीक्षक एस.एम.चिंतामनी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी या धान्यांचा पंचनामा केला असुन सदर धान्य शेवगाव शहरातील स्वामी समर्थ मंगल कार्यालयाच्या पाठीमागे केसभट वस्तीतील असणाऱ्या खाजगी पटागंणातुन भरण्यात आले व कुठे खाली करायचे हे अमरापुर येथे सांगण्यात येईल अशी सुचना दिल्याचा जबाब ट्रक चालक प्रल्हाद दिनकर पवार रा.नवगन राजुरी ता.जि.बिड याने दिला आहे.

       दरम्यान या ट्रक चालकाकडे कुठलेही परमिट व वाहतुक मार्ग नव्हता. सदर ट्रक पोलीस ठाण्यात जमा केला असुन उशिरापर्यंत कारवाई चालू होती.कोरोना काळात शासनाने मोफत व अल्प दरात धान्य वितरण केले मात्र या धान्यांना प्रंचड प्रमाणात काळाबाजार झाला यात महसुल व पोलिस कर्मचारीही सहभागी झाल्याचे खुले आम बोलले जात आहे.

                सदर धान्य पोलिस ठाण्यात जमा करुण जाबजबाब घेण्याच्या सुचना दिल्या आहेत.चौकशीअंती आपण त्यावर कारवाई करणार अस��

जाहिरात
Search
विडिओ
Recent News