पुणे सोलापूर महामार्गावरील डाळज गावच्या हद्दीत झालेल्या अपघातात ३ जण जागीच ठार तर 2 जण जखमी


पुणे सोलापूर महामार्गावरील डाळज गावच्या हद्दीत झालेल्या अपघातात ३ जण जागीच ठार तर 2 जण जखमी

भिगवण (प्रतिनिधी) :नानासाहेब मारकड 

पुणे सोलापूर महामार्गावरील डाळज गावच्या हद्दीत झालेल्या अपघातात ३ जण जागीच ठार तर 2 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.हा अपघात इतका भयानक होता की यात वाहनाचा चक्काचूर झाला आहे.

भिगवण पोलीस सुत्रानी  दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या लग्नाच्या खरेदीला जात असताना हा अपघात घडला.या अपघातात गीता अरुण माने (वय ३६ ),मुकंद अरुण माने (वय २५),अरूण बाबुराव माने (वय ४५ )असे एकाच कुटूंबातील तिघेजन जागीच मृत पावली आहेत.तर साक्षी अरुण माने (वय १८), ड्रायव्हर महादेव रकमाजी नेटके (वय ५६) अशी जखमीची नावे आहेत.सदर ट्रॅक्टर केतुर येथून ट्रालीमध्ये उस भरुन माळीनगर साखर कारखाना येथे घेवून जात असताना मौजे डाळज नं 2 गावचे हददीत पुणे सोलापूर हायवे रोडवर पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या फाँरच्युनर गाडी नं एम.एच .24 ए.टी 2004 हीने पाठीमागील ट्रालीस पाठीमागून धडक देवून अपघात झाला.अपघात इतका भीषण होता की मृतदेह काढण्यासाठी क्रेन चां वापर करण्यात आला.

ऊस वाहतूक करणाऱ्या गाडीला अपघात ग्रस्त गाडी ने पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला.वेगात असणाऱ्या या गाडीच्या ड्रायव्हर ला ऊस वाहतूक करणारे वाहन न दिसल्यामुळे अपघात झाला.तर या ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनाला कोणताही रीपलेकटर नसल्यामुळे अपघात घडल्याचे स्थानिक सांगत आहेत.

पुणे सोलापूर महामार्गावरून होणारी ऊस वाहतूक हा गंभीर प्रश्न असुन त्यामुळे निष्पाप नागरिकांना अपघातात आपले जीव गमवावे लागत आहेत.या ऊस वाहतूक ड्रायव्हरने केलेल्या चुकीमुळे अनेक संसार उघडे पडत आहेत. कर्णकर्कश आवाजात चालणारे टेप , दोन ऊस वाहतूक करणाऱ्या वाहणामधील लागलेली शर्यत ,तसेच रेल्वे सारख्या जोडलेल्या मोकळ्या ट्रेलर त्यामुळेच असे भीषण अपघात घडतात आणि एकाच घरातील तीन जणांचा जागीच मृत्यू होतो.सदर अपघाताची खबर भिगवन पोलीस ठाण्यात देण्यात आली असून याचा तपास प्रभारी पोलीस अधिकारी जीवन माने यांच्या मार्गदर्शन खाली पो.स. ई रुपणवर करीत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News