दौंड नगर चौकात बस थांबा नसल्याने होतेय वाहतूक कोंडी, रस्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर


दौंड नगर चौकात बस थांबा नसल्याने होतेय वाहतूक कोंडी, रस्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी: मनमाड बेळगाव रस्ता दौंड तालुका हद्दीत आल्या पासून वादातच आहे,अरुंद रस्ता येथूनच हा रस्ता वादातीत आला आहे,याविषयी कितीतरी आंदोलने झाली परंतू ठेकेदार,कॉन्ट्रॅक्टर ना पुढारी कोणालाही घाम फुटला नाही,काल परवा महिलांनी अरुंद रस्त्यासाठी रस्त्यावर चूल करून भाजी भाकरी करून अनोख्या पध्दतीने आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्यासाचा प्रयत्न केला आहे, नगरचौक येथील रस्ता लॉक डाऊन काळात उरकून घेतला आहे, त्यावेळी वाहतूक ठप्प होती, आता बस (एस टी) सुरू झाल्या आहेत, आणि लांब पल्ल्याच्या गाड्या या ठिकाणी थांबा घेतात,या ठिकाणाहून पुणे,बारामती कडे जाणारे प्रवाशी थांबतात त्यांना घेण्यासाठी बस रस्त्यातच थांबवल्या जातात,एवढा मोठा वाहतुकीचा मार्ग असून त्या ठिकाणी बस थांबा नसल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे, या गोष्टी फक्त दौंड तालुक्यातच घडतात अशी धारणा दौंड करांची झाली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News