ऐच्छिक वाहन स्क्रॅपिंग पॉलिसी आणि भविष्य... काय म्हणाले गडकरी जाणून घ्या!


ऐच्छिक वाहन स्क्रॅपिंग पॉलिसी आणि भविष्य... काय म्हणाले गडकरी जाणून घ्या!

सहसा आपण जेव्हा नवीन वाहने घेतो तेव्हा, जुने वाहन विकतो आणि त्यात आणखी पैसे घालून नवीन वाहन खरेदी करतो. मात्र आता तुमच्या इच्छेनुसार, ते वाहन तुम्हाला स्क्रॅप करावे लागणार आहे.

"नवीन स्क्रॅपेज पॉलिसी अंतर्गत नवीन वाहन खरेदी करताना आपल्या जुन्या आणि प्रदूषण करणार्‍या वाहनांना स्क्रॅप करण्याचा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना अनेक फायदे दिले जातील." असे गडकरी म्हणाले.येत्या काही वर्षांत भारतीय वाहन उद्योगाचा व्यवसाय 30 टक्क्यांनी वाढून 10 लाख कोटी रुपयांवर जाईल.

यामुळे कोविड-19 साथीच्या दुष्परिणामांवर विजय मिळविण्यासाठी ऑटो उद्योगांना मदत होईल. आता, 20 वर्ष आणि 15 वर्षांपूर्वीची खासगी वाहने रस्त्यावर धडकणार नाहीत.

ऑटो इंडस्ट्रीला होणार फायदा

जे ग्राहक आपली वाहने स्क्रॅप करतील त्यांना उत्पादकाकडून काही फायदा दिला जाईल. यामुळे अर्थव्यवस्थेला केवळ चालनाच मिळणार नाही तर, वाहन उद्योगालाही फायदा होईल. वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी होईल.

स्क्रॅपिंग पॉलिसी स्वीकारली नाही तर होणार हे...

 ज्या लोकांनी हा पर्याय निवडला नाही, त्यांच्यासाठी काय? याविषयी बोलताना गडकरी म्हणाले,त्यासाठी ग्रीन टॅक्स आणि इतर शुल्काची तरतूद आहे. अशा वाहनांना कठोर ऑटोमेटेड फिटनेस टेस्ट द्यावी लागेल.

 सेकंड हँड वाहन खरेदी करणाऱ्यांना मात्र आता विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल. कारण, वाहन फिटनेस परीक्षेत पात्र ठरले नाही तर, ते स्क्रॅप करावे लागेल. 


जाहिरात
Search
विडिओ
Recent News