वरिष्ठ राज्यस्तरीय अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरीसाठी निमगाव वाघात 18 फेब्रुवारीला कुस्ती निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन


वरिष्ठ राज्यस्तरीय अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरीसाठी निमगाव वाघात 18 फेब्रुवारीला कुस्ती निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - निमगाव वाघा (ता. नगर) येथे गुरुवार दि. 18 फेब्रुवारी रोजी 64 वी वरिष्ठ राज्यस्तरीय गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा (अधिवेशन) व महाराष्ट्र केसरी किताब लढत 2020-21 स्पर्धेसाठी नगर तालुका तालीम सेवा संघाच्या वतीने कुस्ती निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी नगर तालुक्यातील कुस्तीगिरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नगर तालुका तालीम सेवा संघाचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, सचिव बाळू भापकर, उपाध्यक्ष काशिनाथ पळसकर, सहसचिव सुभाष नरवडे, खजिनदार किसन वाबळे, उत्तम कांडेकर, चंद्रकांत पवार यांनी केले आहे.

या स्पर्धेचे शुभारंभ जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पै. वैभव लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. स्पर्धेच्या दिवशी सकाळी आठ ते दहा या वेळेत वजनासाठी मल्लांना उपस्थित रहावे. वजनानंतर कुस्ती स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. पंच म्हणून एनआयएस कुस्ती कोच गणेश जाधव व प्रियंका डोंगरे काम पाहणार आहेत. स्पर्धेसाठी 57, 61, 65, 70, 74, 79, 86, 92, 97 व महाराष्ट्र केसरी गटसाठी 86 ते 125 किलो वजनगट (गादी व माती) देण्यात आले आहेत. स्पर्धेला येताना खेळाडूंनी खेळाडूंनी पासपोर्ट फोटे व आधारकार्ड सोबत आनणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी पै. नाना डोंगरे 9226735346 यांना सपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News