कर्जदारास मारहाण करणार्‍यांवर गुन्हा दाखल.. छावा क्रांतीवीर सेनेच्या आंदोलनाला यश


कर्जदारास मारहाण करणार्‍यांवर गुन्हा दाखल.. छावा क्रांतीवीर सेनेच्या आंदोलनाला यश

मात्र खाजगी फायनान्स कंपनीवर कारवाई झाली नसल्याने पुन्हा आंदोलनाचा इशारा

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) कोरोनाच्या संकट काळात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात कर्जदारांना वेठीस धरुन खाजगी एजंटा मार्फत अवाजवी वसूली करणार्‍या खाजगी फायनान्स कंपनीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनाला यश आले आहे. खाजगी फायनान्स कंपनीच्या सांगण्यावरुन टाळेबंदीत गाडी हिसकावण्यासाठी आलेल्या व मारहाण करणार्‍या विरोधात फिर्यादी साहेबराव चांदणे यांच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साहेबराव चांदणे (वय-35 रा. वडगावगुप्ता) यांनी 2018 साली मालवाहू गाडी चौलामंडल फायनान्स सावेडी शाखा येथून कर्जाने घेतली होती. त्यांनी फेब्रुवारी 2020 पर्यंत नियमीत कर्जाचे हप्ते भरले. दि.16 मार्च रोजी सदरील मालवाहू गाडी वडगाव गुप्ता येथून शेंडी बायपासने औरंगाबाद रोडला जायला निघाली असता वडगाव शिवारातून खारा ओढ्याजवळून जात असताना मोटारसायकलवर तीन व्यक्ती ट्रिपल सीट आले. त्यापैकी तानाजी झोंड (रा. सावेडी), संदीप दहातोंडे (रा. चांदा, ता. नेवासा) व इतर तीन अनोळखी व्यक्तींनी गाडी थांबवून मालवाहू गाडीतून बाहेर काढून काठीने मारहाण केल्याचे चांदणे यांनी फिर्यादीत म्हंटले आहे. मारहाण करणार्‍या व्यक्ती व फायनान्स कंपनीवर कारवाई करण्यासाठी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालया जवळील भूजल सर्वेक्षण कार्यालय येथे उपोषण करण्यात आले होते. या आंदोलनाची दखल घेऊन पोलीस उपाधिक्षक प्रांजली सोनवणे व विशाल ढुमे यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार मारहाण करणार्‍या सदर आरोपींवर दि.3 फेब्रुवारी रोजी कलम 234 व 24 नुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. मात्र गाडीचा हप्ता थकल्याने कर्जाच्या वसुलीसाठी आरोपींना गाडी हिसाकवण्यासाठी पाठविणारे खाजगी फायनान्स कंपनीवर कारवाई झाली नसून, संबंधीत आरोपींवर सौम्य कलम लावल्याने पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.    

जाहिरात
Search
विडिओ
Recent News