वायसेवाडी शाळेच्या वैभवात आणखी एक मानाचा तुरा


वायसेवाडी शाळेच्या वैभवात आणखी एक मानाचा तुरा

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे) पर्यावरण संरक्षण काळाची गरज व प्रत्येक सजीवाचे कर्तव्य तसेच समाजसेवा आपली सामाजिक बांधिलकी हे जाणून महाराष्ट्र राज्यातील ३६ जिल्हे तसेच इतर १६ राज्य आणि नायजेरिया, केनिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि जपान अशा इतर ५ देशांत संस्थेची स्थापन करून अविरत प्रामाणिक कार्य करीत असलेल्या पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था, भारत संस्थेच्या महाराष्ट्र राज्य - वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा - २०२० अंतर्गत संस्थेच्या वतीने शैक्षणिक,  सामाजिक, क्रिडा व सांस्कृतिक, पर्यावरण तसेच कोरोना संसर्ग काळातही विद्यार्थ्यांच्या शालेय अभ्यासक्रमात खंड पडू नये म्हणून ऑनलाईन शिक्षण पद्धतीने उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या शाळांना दिल्या जाणार्‍या पुरस्कारामध्ये पुणे जिल्ह्यातील जि.प. प्राथमिक शाळा वायसेवाडी व शिक्षक यांचा संस्थेच्या वतीने ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री पद्मभूषण माननीय अण्णासाहेब हजारे व या संस्थेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष देवा तांबे सर यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच सन्मानपत्र अण्णांचे निवासस्थानी राळेगणसिद्धी (नगर) येथे प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

       याप्रसंगी पर्यावरण मित्र  बहुउद्देशीय संस्थेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक लतीफ राजे सर, सातकर सर व वायसेवाडी शाळेचे सर्व शिक्षक उपस्थित होते. यावेळी सन्माननीय अण्णा यांनी शाळेच्या कार्याचे कौतुक केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News