कोपरगाव तालुक्यात महसूल विजय सप्तपदी अभियानाला सुरुवात !! तहसिलदार योगेश चंद्रे यांची माहिती*


कोपरगाव तालुक्यात महसूल विजय सप्तपदी अभियानाला सुरुवात !!   तहसिलदार योगेश चंद्रे यांची माहिती*

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव तालुक्यात महसूल विभाग मार्फत तहसिल कार्यालय, कोपरगाव वतीने सर्वसामान्य जनता,शेतकरी यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात महसूल विजय सप्तपदी अभियानाला सुरुवात झाली आहे.पहिल्याच दिवशी मल्हारवाडी येथील शेतजमीन रस्ता अडथळे दूर करुन वहीवाटीसाठी खुला करण्यात आला असल्याची माहिती तहसिलदार योगेश चंद्रे यांनी दिली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली रविवार दि.७ फेब्रुवारी २०२१ ते बुधवार दि.३१ मार्च २०२१ पर्यंत महसूल विजय सप्तपदी अभियान राबविण्यात येणार आहे.

सर्वसामान्य जनता, शेतकरी यांच्या विविध दैनंदिन प्रश्नांसंदर्भात त्वरीत निकाली काढण्यासंदर्भात राज्यात त्याच बरोबर अहमदनगर जिल्ह्यात महाराजस्व अभियान हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.या अभियानात शेतकरी खातेदारांच्या व जनतेच्या अत्यंत निकडीच्या व जिव्हाळ्याच्या बाबींमध्ये विशेषत्वाने व पुढाकाराने कामकाज होणार आहे.

या अभियानात मामलेदार न्यायालय अधिनियम १९०६ खालील प्राप्त प्रकरणांची मोहीम स्वरूपात निर्गती करणे. गाव नकाशा वरील अतिक्रमित व बंद झालेली विविध रस्ते लोकसहभागातून मोकळी करण्यासाठी विशेष मोहीम राबविणे. तुकडेजोड-तुकडेबंदी अधिनियम २०१७ नुसार अधिमूल्य रक्कम आकारून नियमित कारणाची विशेष मोहीम राबविणे.गांव तेथे स्मशानभूमी/दफनभूमी. पोटखराबा वर्ग अ खालील जमीन लागवडीखाली आणण्यासाठी विशेष मोहीम राबविणे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील गायरान/ सार्वजनिक वापरातील/शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी केलेली अतिक्रमणे नियमाकुल करणे. प्रलंबित खंडकरी शेतकऱ्यांना जमीन वाटप करणे. अशा सात विषयाबाबत कालबद्ध महसूल विजय सप्तपदी अभियान सुरू करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे. असे आवाहन तहसील कार्यालय कोपरगाव यांनी केले आहे. हे अभियान यशस्वीतेसाठी नायब तहसीलदार, मंडलाधिकारी, तलाठी तसेच तहसिल कार्यालयाचे कर्मचारी परिश्रम घेत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News