आरोग्य चळवळीत योगदान देणारे जालिंदर बोरुडे जलसंपदा विभागाचे भूषण -राज्य मंत्री बच्चू कडू


आरोग्य चळवळीत योगदान देणारे जालिंदर बोरुडे जलसंपदा विभागाचे भूषण -राज्य मंत्री बच्चू कडू

आरोग्य क्षेत्रात गरजू रुग्णांसाठी सुरु असलेल्या कार्याची दखल घेत जलसंपदा राज्य मंत्री बच्चू कडू यांनी फिनिक्स फाऊंडेशनचे अध्यक्ष बोरुडे यांचा केला गौरव

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - सामाजिक चळवळीत योगदान देत गरजू रुग्णांसाठी आधार ठरलेले जलसंपदा विभागातील कर्मचारी जालिंदर बोरुडे या विभागाचे भूषण ठरले आहे. एक सरकारी कर्मचारी एवढ्या मोठ्या प्रमाणात गोर-गरीब वंचितांसाठी आरोग्य चळवळ चालवतो हे पाहून भारावलो आहे. ईश्‍वराने दिलेले आयुष्य वंचितांना मदत करण्यासाठी असून, या भावनेने बोरुडे यांचे फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने सुरु असलेले कार्य कौतुकास्पद असल्याची भावना जलसंपदा राज्य मंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केली. 

जलसंपदा राज्य मंत्री बच्चू कडू अहमदनगर येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयास भेट दिली असता त्यांनी फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांच्या आरोग्य क्षेत्रात गरजू रुग्णांसाठी सुरु असलेल्या कार्याची दखल घेत त्यांचा गौरव केला. तसेच अहमदनगर जलसंपदा विभागाच्या वतीने राज्यमंत्री बच्चू कडू यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जलसंपदाचे कार्यकारी अभियंता जी.बी. नान्नोर, मुळाचे कार्यकारी अभियंता सायली पाटील, उपअभियंता विकास शिंदे, दहातोंडे, महेंद्र राजगुरु, सरोदे, विनोद परदेशी, प्रविण तिडके आदी उपस्थित होते. द्या अंधांना दृष्टी, पाहतील तेही सृष्टी या उक्तीनुसार समाजातील गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, महिला, मजूर, कामगार व आर्थिक दुर्बलघटकातील दृष्टीदोष असलेल्यांना फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून जालिंदर बोरुडे यांनी नवदृष्टी देण्याचे कार्य केले. नेत्रदान चळवळीत सक्रीय योगदान देत 923 दृष्टीहीनांना नवदृष्टी देण्यास त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. जलसंपदा विभागात कर्मचारी म्हणून कार्यरत राहून त्यांनी आपल्या आईच्या प्रेरणेने फिनिक्स सोशल फाऊंडेशनची स्थापना करुन नगर तालुक्यातील नागरदेवळे येथून आरोग्य क्षेत्रात कार्य करण्यास सुरुवात केली. दर महिन्याला मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरासह विविध आरोग्य शिबीर घेण्याचा त्यांचा उपक्रम सुरु आहे. अखंडितपणे या उपक्रमास 26 वर्ष पुर्ण झाली आहेत. या चळवळीच्या माध्यमातून महिन्याला पाच वेळा जिल्ह्यातील विविध ठिकाणी नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेतले जात आहे. तर कोरोनासारख्या महामारीत सर्वसामान्यांची व हातावर पोट असलेल्या कामगारांची आर्थिक परिस्थिती बिकट बनली असताना, गरजू रुग्णांची गरज ओळखून शहरासह ग्रामीण भागात मोठ्या धाडसाने मोफत आरोग्य शिबीरे घेण्यात आली. मागील आठ ते नऊ महिन्यात कोरोना काळात नियमांचे पालन करुन झालेल्या शिबीराचा तब्बल हजारो रुग्णांनी लाभ घेतला. तर अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या आहेत. गरजू, गोर-गरीब रुग्णांकरिता फिनिक्स फाऊंडेशन आधार ठरत आहे. फाऊंडेशनच्या सदर कार्याची माहिती घेऊन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कौतुक केले. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News