नागरिकांच्या सहकार्याने या भागातील विकास कामे पुर्णत्वास येत आहेत - अविनाश घुले
नगर प्रतिनिधी संजय सावंत:
प्रभाग 11 हा विस्ताराने मोठा आहे, तरीही प्रत्येक भागात मुलभुत सुविधा पुरविण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असतो. गाडळकर मळा परिसरात लोकवसाहती वाढत आहे, या वसाहतीमधील नागरिकांना सर्व सुविधा पुरविणे गरजेचे आहे. या परिसरात टप्प्याटप्प्याने विकास काम होत असल्याने अनेक वसाहतींची संख्याही वाढत आहे. मुलभुत सुविधा पूर्ण होत असल्याने नागरिकही या परिसरास पसंती देत आहेत. या भागात रस्ते, पाणी, ड्रेनेज लाईन या मुलभूत सुविधांबरोबरच ज्येष्ठ नागरिक, मुले-महिलांसाठी जॉगिंग पार्क, उद्यानासारखे विकास कामेही पुढील काळात करणार आहोत. नागरिकांचे सहकार्याने जास्तीत जास्त निधी या भागातील कामांसाठी आणण्यात येईल, असे प्रतिपादन नगरसेवक अविनाश घुले यांनी केले. 11 सारसनगर, गाडळकर मळा ते राजवर्धन अपार्टमेंट येथील ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक अरुणराव गाडळकर यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी नगरसेवक अविनाश घुले, संतोष जाधव, अजय लांडगे, ओम राजगुरु, चेतन मेहेर, दिलीप मगर, अमित गाडळकर, चंद्रकांत अमृते, राहुल गाडळकर, प्रविण कानगुडे, अॅड.अमोल गावडे, अर्जुन भाबड आदि उपस्थित होते.
याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक अरुणराव गाडळकर म्हणाले, या भागात नव्याने वसाहती होत असल्याने या भागातील नागरिकांच्या रस्ते, पाणी, ड्रेनेज लाईनसारख्या मुलभूत सुविधा आवश्यक आहेत. त्यासाठी नगरसेवक अविनाश घुले यांच्याकडे मागणी केल्यानंतर त्यांनी या भागातील आवश्यक सुविधांना प्राधान्य देऊन कामे करत आहेत. आज ड्रेनेज लाईनची सुविधा झाल्याने या परिसरातील नागरिकांची मोठी सोय झाली आहे. भविष्यात या कामांमुळे हा भाग चांगल्या प्रकारे विकसित होईल.
याप्रसंगी संतोष जाधव, ओम राजगुरु यांनीही नगरसेवक अविनाश घुले हे या भागात करत असलेल्या विविध कामांचे कौतुक करुन आभार मानले.