संत वामनभाऊ महाराज पुण्यतिथी निमित्त शिव भगवान प्रतिष्ठान ढाकणेवस्ती आणि अमजदभाई पठाण मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कीर्तन सोहळा संप्पन्न


संत वामनभाऊ महाराज पुण्यतिथी निमित्त शिव भगवान प्रतिष्ठान ढाकणेवस्ती आणि अमजदभाई पठाण मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कीर्तन सोहळा संप्पन्न

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण :

शेवगांव शहरातील ढाकणे वस्ती येथे काल शुक्रवार दिनांक 05 रोजी संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त  एकदिवसीय कीर्तन मोहोत्सव आयोजित केला होता या कार्यक्रमाला ढाकणे वस्ती आणि परिसरातील नागरिक महिला बालगोपाल आणि भाविक मोठया संख्येने उपस्थित होते आपल्या सुमधुर वाणीने ह.भ. प. श्री.  मारुती महाराज झिरपे यांनी सुमारे दोन तास अतिशय सुंदर निरूपण केले वामनभाऊ महाराज भगवानबाबा खंडोबा महाराज आणि शेवगांव पाथर्डी आणि गर्भगिरी पर्वतातील संत महात्म्यांची परंपरा महाभारत ज्ञानेश्वर महाराज सोदाहरण स्पष्ट केले कार्यक्रमाचे सूत्र संचालन ह. भ. प. गावडे महाराज  यांनी केले यावेळी कार्यक्रमाचे आयोजक अमजद भाई पठाण व त्यांच्या सहकाऱ्यांचा यथोचित सत्कार शिवभागवान प्रतिष्ठान च्या कार्यकर्त्यांनी केला या वेळी कार्यक्रमास जि प सदस्या सौ हर्षदाताई काकडे भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्री.  अरुण मुंढे सामाजिक कार्यकर्ते श्री. अविनाश देशमुख तलाठी श्री. रवींद्र गर्जे यांच्या सह सामाजिक राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सुरेख आयोजन केल्याबद्दल झिरपे महाराजांनी अमजद भाई पठाण यांचा विशेष गौरव केला खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे अमजद भाई मुस्लिम समाजाचे असुन देखील हिंदु मुस्लिम ऐक्याचे दर्शन या कार्यक्रमांमुळे दिसुन  शिव भगवान मंडळाच्या तरुण कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम  घेतले  त्यांच्या भावी सामाजिक उपक्रमास हार्दिक शुभेच्छा अविनाश देशमुख शेवगांव सामाजिक कार्यकर्ता

जाहिरात
Search
विडिओ
Recent News