शिक्षक बँक निवडणुकीसंदर्भात स्वराज्य चा शिक्षक मेळावा


शिक्षक बँक निवडणुकीसंदर्भात स्वराज्य चा शिक्षक मेळावा

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

नवी उमेद नवी आशा नवे राज्य हे ब्रीद घेऊन स्वराज्य मंडळाने शिक्षक बँकेत नवा आणि सक्षम पर्याय देण्याचा नव्या पिढीचा मनसुबा दिसत आहे अहमदनगर जिल्ह्याची कामधेनु असलेली ही शिक्षक बँक असून आगामी काळात स्वराज्य मंडळ शिक्षक बँकेच्या अहमदनगर जिल्ह्यातील सर्व जागा पूर्ण ताकदीने लढणार असून आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकण्या करिता शिक्षक पदाधिकाऱ्यांचा भव्य मेळावा आयोजित केला असल्याची माहिती शेवगाव तालुका अध्यक्ष अरुण भाऊ पठाडे यांनी दिली आहे तसेच या मेळाव्यास जिल्हाभरातून सर्व शिक्षकवृंद व भगिनी मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे नेते पठाडे यांनी दिली आहे तसेच या मेळाव्यास जिल्हा नेते ज्ञानेश्वर सोनवणे ,राजेंद्र ठोकळ, योगेश थोरात, तोहसिफ सय्यद, भाऊसाहेब पाचरणे, देवेंद्र आंबेटकर ,राज चव्हाण, नीलेश राजवळ ,जिल्हाध्यक्ष सचिन नाबगे ,प्रतीक नेटके, मच्छिंद्र भापकर, सतीश पठारे, आदींसह जिल्हाभरातील नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत तरी या मेळाव्यास तालुक्यातील शिक्षक बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व आपले मत व्यक्त करावे असे आवाहन शेवगाव तालुका स्वराज्य मंडळ कार्यकारिणी च्या वतीने करण्यात आले आहे

:- अहमदनगर शिक्षक बँक ही सर्व शिक्षक बांधवांची कामधेनू असून शिक्षक बांधवांच्या कष्टाने उभी राहिली आहे त्यामुळे आता आगामी निवडणूक ही तरुण पिढी स्वराज्य मंडळाच्या नावाने लढणार असून स्वराज्य मंडळ आगामी निवडणुकीत आपली ताकद प्रस्थापितांना दाखवून देणार आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News