लोणी भापकरला शेतीपंप ग्राहकांकरिता मार्गदर्शन शिबीर संपन्न


लोणी भापकरला शेतीपंप ग्राहकांकरिता  मार्गदर्शन शिबीर संपन्न

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)

लोणी भापकर महावितरण शाखेअंतर्गत येणार्‍या सर्व शेतीपंप ग्राहकांकरिता कृषीपंप वीज बिल सवलत, कृषी योजना 2020 या योजनेबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी लोणी भापकर ग्रामपंचायत कार्यालय याठिकाणी शुक्रवार दि. ५ फेब्रुवारी रोजी दुपारी मार्गदर्शन शिबीर आयोजित केले होते. सदरच्या ग्रामसभेत महावितरणच्या वतीने कृषी योजना २०२०, ५०% थकबाकी,  शेतीपंप कनेक्शन, बील दुरुस्ती याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. 

  शेतकऱ्यांनी थकीत वीजबिल भरुन कृषी योजना २०२० मध्ये सहभागी होण्याचे आवाहन यावेळी शेतकऱ्यांना करण्यात आले. यावेळी बारामती विभागीय कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता महेंद्र सूर्यवंशी, उपव्यवस्थापक सुगंध कांबळे, उच्चस्तरीय लिपिक नागेश सरडे, कनिष्ठ अभियंता धनराज ढमाले, सरपंच रवींद्र भापकर ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व परिसरातील शेतकरी बांधव या कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News