दौंड मध्ये डिजे मालकावर पोलिसांवर अरेरावी आणि सार्वजनिक शांतता भंग प्रकरणी गुन्हा दाखल


दौंड मध्ये डिजे मालकावर पोलिसांवर अरेरावी आणि सार्वजनिक शांतता भंग प्रकरणी गुन्हा दाखल

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

माननीय सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे व अटींचे उल्लंघन केल्या प्रकरणी डिजे मालकावर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलीस नाईक शरद वारे यांनी दिली आहे. यातील हकीकत अशी की दौंड शहरातील वरदविनायक कॉलोनी जवळील मोकळ्या जागेत एका कार्यक्रमात डिजे साउंड सिस्टीम वाजवली जात होती, परंतू माननीय सर्वोच्च न्यायालयाने डिजे वाजवण्यावर बंदी घातली आहे, आवाजाची मर्यादा आणि वेळेचं बंधन त्यामध्ये आहे,परंतू सदर ठिकाणी रात्री 11:30 वाजता हा डिजे सुरू असल्याने कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर डिजे मालक संदिप जगन्नाथ शितोळे याने मोठमोठ्याने आरडाओरडा करून अरेरावीची भाषा वापरली, त्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल अप्पासो नागमल यांच्या फिर्यादीवरून डिजे मालक संदिप शितोळे याच्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या नियम व अटींचे उल्लंघन करून व ठरवून दिलेल्या वेळेच्या मर्यादेपेक्षा साउंड सिस्टीम सुरू ठेवून आजूबाजूच्या लोकांना त्याचा त्रास होत होता आणि पोलिसांना अरेरावी केल्याच्या कारणावरून भा द वि कलम 268,188 म. पोलीस कायदा कलम 110,112,117,33(r) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ज्ञानेश्वर राऊत पूढील तपास करीत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News