मोशीत शनिवारी चक्का जाम आंदोलन, दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठिंबा


मोशीत शनिवारी चक्का जाम आंदोलन, दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठिंबा

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

पिंपरी, पुणे (दि. 4 फेब्रुवारी 2021) दिल्लीमध्ये मागील एकाहत्तर दिवसांपासून शेतक-यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी शनिवारी (दि. 6 फेब्रुवारी) देशातील बहुतांशी राजकीय पक्षांनी आणि विविध सामाजिक संघटनांनी ‘राष्ट्रीय चक्का जाम’ आंदोलन पुकारले आहे. या अंतर्गत पिंपरी चिंचवड शहरातील विविध पक्ष आणि संघटनांच्या वतीने शनिवारी (6 फेंब्रुवारी) दुपारी 12 ते 3 यावेळेत पुणे नाशिक महामार्गावर मोशी चौकात आंदोलन करण्यात येणार आहे, असे पत्रक कामगार संघटना संयुक्त कृती समिती आणि जन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने प्रसिध्दीस देण्यात आले आहे.

       गुरुवारी (दि. 4 फेब्रुवारी) आकुर्डी येथिल श्रमशक्ती भवन येथे विविध राजकीय पक्ष व सर्व कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ठरल्याप्रमाणे पत्रक प्रसिध्दीस देण्यात आले आहे. यावेळी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम, ज्येष्ठ नेते मानव कांबळे, शिवसेना जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे, शिवसेना शहर प्रमुख योगेश बाबर, माजी नगरसेवक मारुती भापकर, सीटू संघटनेचे वसंत पवार, आयटक संघटनेचे अनिल रोहम, प्रहारचे निरज कडू, जन आंदोलन संघर्ष समितीचे असलम बागवान, छावा मराठा युवा महासंघाचे धनाजी येळकर पाटील, संभाजी ब्रिगेडचे सतिश काळे, भारतीय जन संसदचे अॅड. मोहन आडसूळ, अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे सुधीर गुरुडकर, इब्राहिम खान, दिलीप काकडे, गोकुळ बंगाळ, सीपीएमचे गणेश दराडे, डीवायएफआयचे सचिन देसाई तसेच संदिप जाधव, अरुण थोपटे, विशाल फडतरे आदी उपस्थित होते. या चक्का जाम आंदोलनास राष्ट्रवादी शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनीही पाठिंबा दर्शविला आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News