गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते कर्जत पोलिसांच्या निवासस्थानाचे उद्घाटन


गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते कर्जत पोलिसांच्या निवासस्थानाचे उद्घाटन

कर्जत प्रतिनिधी मोतीराम शिंदे :

कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिस वसाहतींची खुप दयनीय अवस्था आहे. यंदाच्या राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात पोलिसांच्या घरासाठी सुमारे ४०० कोटींची तरतूद केली जाणार आहे. रोहित पवारांच्या माध्यमातून पोलिस बांधवांच्या अडचणी सोडवण्याचे प्रयत्नशील पाऊल पडत आहे. आघाडी सरकारने पोलिसांचा ताण कमी करण्यासाठी साडेबारा हजारांची पोलीस भरती करण्यात येणार असून आता ५५०० पोलिसांच्या भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे.पोलिस कर्मचारी बळजबरी करूनही अशा असुविधा असलेल्या ठिकाणी काम करण्यास तयार होत नाहीत.मतदारसंघासाठी काम कसे करायचे हे रोहित पवारांकडून शिकण्यासारखे आहे.अगदी जिल्हा पोलिस अधीक्षकांचे काम असले तरी ते रोहित पवारांना सांगा तिथे माझ्या मध्यस्तीचीही गरज भासणार नाही. रोहित पवारांचा शब्द टाळायची कुणाची टाप आहे?मतदारसंघात सी.सी.टी.व्हीची केलेली मागणी असो किंवा ज्या ज्या योजना घेऊन येतील त्याला मंजुरी देण्याची ग्वाही देतो आणि आघाडी सरकार कायम कर्जत जामखेडच्या पाठीशी राहील.असे मत गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी व्यक्त केले.

     आ.रोहित पवार म्हणाले पोलीस वसाहतीचे भूमिपूजन कार्यक्रम पार पडत आहे याचा मनस्वी आनंद होत आहे.मतदारसंघात अनेक कामे करायची आहेत. लोकांना विश्वास वाटला म्हणुन माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.जिल्हा पोलिस दलासाठी आगामी काळात २० वाहने महाराष्ट्र राज्य सरकारने उपलब्ध केली आहेत.महिलांसाठी भरोसा सेल स्थापन करून भयमुक्त वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

पोलिस स्टेशनला कोणतीही व्यक्ती न्याय मागायला आली तर त्या व्यक्तीला जेंव्हा न्याय मिळेल तेंव्हाच वाटेल की पोलिस स्टेशन चांगले आहे. सध्या कर्जतच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांकडून अडचणी समजुन घेतल्या जात आहेत. हा बदल दिसतोय. खोटे गुन्हे दाखल होतात त्यावर लक्ष देण्याची गरज आहे.मिरजगाव,खर्डा या दोन्ही पोलिस स्टेशनला मान्यता मिळाली आहे.सिद्धटेक आणि राशीनला देखील पोलीस चौकी लवकरच मागणी पूर्ण होईल यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.पोलिसांना चांगल्या सुख सुविधा मिळाल्या तर चांगले अधिकारी या ठिकाणी येतील.

    पोलीस अधीक्षक मनोज पाटील म्हणाले आजचा दिवस पोलीस कुटुंबियांसाठी आनंदाचा क्षण आहे. त्यांच्या घराचे स्वप्न आज पुर्ण होणार आहे. दोन पोलीस अधिकारी आणि ३६ पोलीस कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने साकार होणार आहेत. शेवटी पोलिस उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव यांनी आभार मानले. 

     या कार्यक्रमास आमदार रोहित पवार, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक सौरव आगरवाल, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र दळवी, कॉंग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष प्रवीण घुले, समाज कल्याण समिती सभापती उमेश परहर, कर्जत पंचायत समितीच्या सभापती अश्विनी कानगुडे, पोलीस गृहनिर्माणच्या दीपाली भाईक, प्रांताधिकारी अर्चना नष्टे, मनिषा सोनमाळी, डॉ शबनम इनामदार, राजेश्वरी तनपुरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, पंचायत समिती मा सभापती नानासाहेब निकत, अशोक जायभाय, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील शेलार, नाथाशेठ गोरे, बबनभाऊ नेवसे, सतिष पाटील, विशाल मेहेत्रे सर, रज्जाक झारेकरी, भास्कर भैलुमे, बिभीषण खोसे, संजय भिसे, पृथ्वीराज चव्हाण, बळीराम यादव, दीपक शहाणे, पोलीस उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव,तहसीलदार नानासाहेब आगळे, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश माने, अमरजित मोरे, भगवान शिरसाठ, बारामती ऍग्रोचे राजेंद्र पवार सर्व पोलीस कर्मचारी  उपस्थित होते. आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार निलेशजी दिवटे यांनी केले. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News