दौड मध्ये 21 गायींना कत्तलीपासून जीवदान ! दोघांवर गुन्हा दाखल


दौड मध्ये 21 गायींना कत्तलीपासून जीवदान ! दोघांवर गुन्हा दाखल

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

-काल दिं. 3.2.2021 रोजी दौड पो स्टे च्या हद्दीत कसाई मोहल्ला , इदगाह मैदानाच्या पाठीमागील बाभळीच्या झाडीत कसायांनी गायी व बैल कत्तलीसाठी बांधलेले असल्याची माहिती गोपनीय खबरी मार्फत मिळाली, त्यानुसार पुणे येथील मानद पशुकल्यान अधिकारी श्री शिवशंकर स्वामी यांनी  वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली व कायदेशीर कारवाई करण्याची विनंती केली. त्यावेळी सदर ठिकाणी दौड चे पोलीस निरीक्षक नारायण  पवार  व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता बाभळीच्या झाडीत एकूण 21 गायी बांधलेल्या दिसल्या. त्यांना जखमा झालेल्या होत्या सर्व जनावरे घायाळ झालेली होती. पोलिसांनी सर्व गायी ताब्यात घेऊन अमोल गवळी यांच्या फिर्यादी वरून  इद्रिस अबील कुरेशी व मेहमूद अहमद हानिफ खान यांच्यावर दौंड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संवर्धन सुधारणा अधिनियम चे कलम 55(अ)5(ब)8.9.तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 3.11भा द वि कलम 34 नुसार गुन्हा नोंद करून सर्व गायी दौंड पोलीस स्टेशन येथील सहा टेम्पो मध्ये भरल्या या टेम्पो चालकांनी देखील भाडे न घेता फक्त डिझेल चे पैसे घेऊन सहकार्य केले, स्वामी यांनी त्यांचे ही आभार मानले, त्या सर्व गायी श्री बोरमलनाथ गोशाळा यवत येथे सुखरूप सोडण्यात आल्या असल्याचे माहिती पोलीस हवालदार बंडगर यांनी दिली आहे,याकारवाईत अभिजित चव्हाण , शरद कोतकर , गणेश हुलावळे इ गोरक्षकांनी सहभाग घेतला. कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी नारायण पवार  व त्यांच्या सहकाऱ्यांचे मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी मनःपूर्वक आभार मानले.यावेळी श्री बोरमलनाथ गोशाळेचे अध्यक्ष   आबा शेलार यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे स्वामी यांनी सांगितले.  पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तन्वीर सय्यद करीत पुढील तपास करीत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News