सायंबाचीवाडीला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची शिवारफेरी निमित्ताने भेट


सायंबाचीवाडीला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची शिवारफेरी निमित्ताने भेट

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)

पाणी फाउंडेशनचा जलसंवर्धन हा हेतू जरी असला तरी त्यातून मनसंवर्धन होत असून वेगवेगळी गावे या माध्यमातून टॅंकरमुक्त झालेली आहेत. या कामांचा फायदा गावातील शेतकऱ्यांना होत आहे हे पाहून जिल्हाधिकारी यांनी सायंबाचीवाडी गावच्या ग्रामस्थांचे कौतुक केले.

   बारामती तालुक्यातील सायंबाचीवाडी या गावाने लोकसहभागामार्फत पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून चांगले काम केले आहे ते शिवारफेरीच्या निमित्ताने पाहण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख याठिकाणी आले होते.

    यावेळी त्यांनी पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून केलेले सीसीटी, बांधबंदिस्ती, विहीर पुनर्भरण, ओढा खोलीकरण, मुरघास प्रकल्प, तलाव सुशोभीकरण, ई पीक पाहणी व आजूबाजूला असणाऱ्या शेतातील पिकांचीही पहाणी केली.

   यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते, पाणी फाउंडेशनचे प्रमुख डॉ.अविनाश पोळ, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, ऍड. भगवानराव खारतोडे, प्रमोद जगताप, पानी फाउंडेशनची टीम, सायंबाचीवाडी गावचे ग्रामस्थ यासह विविध विभागातील अधिकारी व परिसरातील गावचे पदाधिकारी उपस्थित होते.

 याप्रसंगी उपस्थितांचे स्वागत शरद भापकर, सूत्रसंचालन मनोहर भापकर यांनी तर आभार मारुती घाडगे यांनी मानले. यावेळी सायंबाचीवाडीचे पोलीस पाटील गोविंद जगताप यांच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News