17 फेब्रुवारी रोजी शिर्डी येथे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राज्यस्तरीय कार्यकर्ता/पदाधिकारी संमेलन !


17 फेब्रुवारी  रोजी शिर्डी येथे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राज्यस्तरीय कार्यकर्ता/पदाधिकारी संमेलन !

शिर्डी ,राजेंद्र दूनबळे (प्रतिनिधी):- राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे हे शिर्डी दौऱ्यावर आले असता येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकार परिषद घेतली व पत्रकार परिषदेत पक्षाचे राज्यस्तरीय कार्यकर्ता /पदाधिकारी संमेलन दिनांक 17 फेब्रुवारी 2021 रोजी शिर्डी येथे घेतले जाणार असल्याची ही घोषणा केली.राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा झंझावात संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत जोमाने सुरू आहे दररोज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य अनुभवी नेते, कार्यकर्ते ,महिला, युवक, पक्षात दाखल होत आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर,कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या काळातील गतवैभव रिपब्लिकन पक्षाला प्राप्त करून देण्यासाठी पक्षाचे समस्त नेते पदाधिकारी कार्यकर्ते जीवापाड मेहनत,परिश्रम घेत आहे.

 त्याच अनुषंगाने रिपब्लिकन चळवळ अधिक-अधिक कशी गतिमान करता येईल त्यादृष्टीने समाजातील सर्वच घटक पक्षात सामावून घेण्यासाठी व्यापक स्वरूपाचा कार्यक्रम उभा करणे अपेक्षित आहे असे अण्णासाहेब कटारे यांनी पत्रकार परिषदेत आपले मत व्यक्त केले.

 दिनांक 17 फेब्रुवारी 2021 रोजी शिर्डी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय संमेलनात पक्षाची बांधणी,सभासद नोंदणी, समाज जोडो अभीयान गतिमान करणे, पुढील वर्षाच्या प्रारंभी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिल्हा परिषद ,पंचायत समिती, नगरपालिका ,नगरपरिषद ,महानगरपालिका ,ताकदीने लढविण्याच्या दृष्टीने पक्ष पातळीवर चर्चा करून निर्णय घेणे

 आदि महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल.महाराष्ट्रातील समस्त नेते /पदाधिकारी कार्यकर्ते संमेलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असा विश्वास देखील अण्णासाहेब कटारे यांनी शेवटी व्यक्त केला.

पत्रकार परिषदेत राष्ट्रीय प्रवक्ते गिरीशजी अकोलकर सर, उत्तर अहमदनगर जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊ जगताप, कोपरगाव तालुका अध्यक्ष विकास जगताप, सांस्कृतिक कला विभागाचे राज्य संपर्कप्रमुख शाहीर नंदकुमार खरात ,ज्येष्ठ नेते नानाभाऊ खरात ,पत्रकार सतीश पवार, युवा नेते प्रशांत कटारे, येवला नेते मनोहर जी गरुड, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख महिला आघाडी रमाताई भालेराव, परविन निसार शहा, भारती केदारी, आशा कंगारे, मयुरी जगधने, आदी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News