मुकुंदनगर येथील अशरफुल बनात मदरसेमध्ये मुस्लिम समाजातील वधू-वर परिचय मेळावा संपन्न


मुकुंदनगर येथील अशरफुल बनात मदरसेमध्ये मुस्लिम समाजातील वधू-वर परिचय मेळावा संपन्न

अहमदनगर (:प्रतिनिधी संजय सावंत) मुकुंदनगर येथील अशरफउल वनात मदरसेमध्ये रविवार, दि. ३१ जानेवारी रोजी फराश फौंडेशन, पुणे व मौलाना आजाद विचार मंच, अहमदनगर यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित मुस्लिम समाजातील वधु-वर परिचय मेळाव्याचे ( रिश्तों का जलसा ) आयोजन करण्यात आले होते.

 मेळाव्याची सुरुवात मौलाना अब्दुल रहूफ यांनी कुराण पठण करून केली. मेळाव्याचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ नगरसेवक-अहमदनगर म.न.पा. तथा एटीयू चांद सुलताना हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजचे चेअरमन शेख हाजी नजीर अहमद ऊर्फ नज्जू पहेलवान यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून अॅडव्होकेट शेख फारूक बिलाल, अमजतभाई दंडोती, माजी समाजकल्याण अधिकारी रफिक मुन्शी, काँग्रेसचे जिल्हा सचिव उबेदभाई शेख हे उपस्थित होते. 

 मेळाव्याचे सुत्रसंचालन मौलाना आजाद विचार मंचचे कय्युमभाई हुंडेकरी यांनी केले.याप्रसंगी मार्गदर्शन करताना कय्युमभाई म्हटले की, आज समाजात मुला-मुलींची सोयरीक जुळल्यानंतर आपापसात मोबाईलवरून संपर्क वाढत चालले आहेत. तयाचे काही दुष्परिणाम समोर येत आहेत. एकमेकांच्या आवडीनिवडीविरुद्ध क्षुल्लक कारणावरून दोघांमधे वाद होऊन जुळलेली सोयरीक तुटू लागली आहे. ही बाब समाजास खूप अपमानास्पद व धार्मिक बाबतीत दुःख देणारी आहे. असे घडू नये म्हणून यावर उपाय शोधणे गरजेचे आहे.सोयरीक जुळल्यानंतर लग्नविधीस खूप उशीर लागत आहे, हे सुद्धा बरोबर नाही. प्रेषितांचे जीवन सर्वांनी अंगिकारून अंमलात आणले पाहिजे; जेणेकरून आनंदी व सुखी जीवन जगण्यास यश प्राप्त होईल.

 अॅडव्होकेट फारूक बिलाल यांनी फैज मैरेज ब्युरो व मौलाना आजाद विचार मंच यांच्या सदर प्रयत्नाबद्दल गौरवोद्गार काढले. ह्या प्रयत्नास यश मिळो अशी अल्लाहकडे प्रार्थना केली. समाजातील लग्नासंबंधी चुकीच्या प्रथा मोडीत काढून जुळलेली सोयरीक यशस्वी कशी होईल यावर समाजास मार्गदर्शनपर संबोधन केले.

 मेळाव्याचे अध्यक्ष नज्जू पहेलवान यांनी आपल्या अध्यक्षीय संबोधनपर मार्गदर्शनात मुलींना प्रत्येकाने धार्मिक संस्कार घडवून शिक्षणात अग्रेसर राहण्यास प्रयत्नशील राहावे. लग्न हे साधे (सुन्नत) पद्धतीनेच पार पाडावे, अशी सूचना केली. स्वतः आपल्या मुलांचे लग्न सुन्नत (साध्या) पद्धतीने कसे लावून दिले याची माहिती दिली. समाजास हीच पद्धत अंमलात आणण्याचा उपदेश केला गोरगरिबांच्या अश्या कार्यास आपण सर्वोततपरी मदद करण्यस कधीही तयार आहोत असेही सांगितले.

आजच्या मेळाव्यात पालक व वधू-वर सहभागी झाले होते. या कार्यक्रमावेळी 22 नवीन सोयरीकसाठी नोंद झाली. फैज मैरेज ब्युरोचे अध्यक्ष फराश इंतेखाब यांनी आपल्या मैरेज ग्रुपच्या कार्याबद्दल संपूर्ण माहिती उपस्थितांना दिली. मैरेज ब्युरोकडून फक्त क्षुल्लक नोंदणी फी एकदाच घेत असल्याचे सांगितले. तसेच फैज मैरेज ब्युरोमार्फत गरीब मुलींशी आपल्या मुलांचे लग्न साधेपणाने व सुन्नत पद्धतीने लावून दिलेल्या पालकांना "फक्र-ए-मिल्लत" या पारितोषिकाने सन्मानित करणेत आलेयामागील उद्देश असा आहे की, पैगंबरांनी सांगितलेल्या रीतीरिवाजानुसार प्रत्येकाने मुला-मुलींचे लग्न साधेपणाने, सुन्नत पद्धतीने योग्य वेळी लावून द्यावे. तुटत असलेले संबंध परत जुळावेत, यासाठी प्रयत्नशील राहावे.

फैज मैरेज ब्युरोतर्फे इंतेखाब फराश यांनी मौलाना आजाद विचार मंचचे राज्य सचिव कय्युमभाई हुंडेकरी यांच्या मदत कार्याचा गौरव करुन त्यांचे आभार व्यक्त करीत  सन्मानचिन्ह व पत्र भेट देऊन त्यांचा सत्कार केला. कय्युमभाई हुंडेकरी यांनी फैज मैरेज ब्युरोचे संचालक फराश इंतेख़ाब व फैज मैरेज ग्रूपचे सर्व पदाधिकारी त्यांचे सत्काराबद्दल भावनिक आभार मानले. सर्व उपस्थिताचे अमजतभाई दंडोती यांनी आभार मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News