ई पिक मोबाईल ॲपव्दारे रब्बी हंगामातील पिक पाहणी करण्याचे आवाहन


ई पिक मोबाईल ॲपव्दारे रब्बी हंगामातील पिक पाहणी करण्याचे आवाहन

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)

लोणी भापकर परिसरातील शेतकरी बांधवांनी आपली रब्बी हंगामातील पिक पाहणी ईपिक मोबाईल ॲपव्दारे येत्या ८ दिवसात भरावी असे आवाहन तलाठी व्ही. एम. शिंदे व कृषी सहाय्यक एस.व्ही. डफळ यांनी केले आहे.

     हे ॲप प्ले स्टोअरवर जाऊन इन्स्टॉल करावे, अपडेट करावे. आपल्याला सोसायटीचे पीककर्ज नवे जुने करण्यासाठी ७/१२ वर पिक नोंद तर करावीच लागणार आहे. या ॲपवरूनच फक्त नोंद आत्ता केली जात आहे तसेच पुढील काळात नैसर्गिक आपत्ती आल्यास पिक नोंद आवश्यक आहे, पिक विकासाची पिक नोंद आवश्यक आहे.

ही सुवर्णसंधी आहे की आपणच आपली पिक नोंद करू शकतो यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही सर्व शेतकरी यांनी पिक नोंद ७ दिवसात १००% करून घ्यावी, चालू पड असेल तरीही नोंद करावी अन्यथा पडक्षेत्र लागू शकते .

 पिकांचा फोटो घेताना जीपीएस लोकेशन ऑन करावे लोकेशन ऑन असेल आणि तरीही ॲपवर ऑन करावे असे येत असल्यास गुगल मॅप वर जाऊन लोकेशन ऑन करावे. काही शंका असल्यास तलाठी व कृषी सहाय्यक यांना संपर्क करावा अशी माहिती देण्यात आली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News