दादा चौधरी विद्यालयातर्फे स्वातंत्र्य सेनानी दादा चौधरी यांची 124 वी जयंती उत्साहात साजरी


दादा चौधरी विद्यालयातर्फे स्वातंत्र्य सेनानी दादा चौधरी यांची 124 वी जयंती उत्साहात साजरी

-हिंदसेवा मंडळाच्या दादा चौधरी विद्यालयातर्फे सेनापती कै.कृष्णाजी नरहर तथा दादा चौधरी यांची जयंती  उत्साहात साजरी करण्यात आली.राष्ट्रीय पाठशाळेतील दादा चौधरी यांच्या समाधीस्थळी हिंदसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी  कार्याध्यक्ष अजित बोरा,डॉ.पारस कोठारी,मुख्याध्यापक प्रा. मधुकर साबळे,सेवक प्रतिनिधी विठ्ठल ढगे,दादा चौधरी मराठी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष येवले,शिक्षक दीपक आरडे,अजय महाजन,नितीन केणे,विजय राहिंज,दिनेश मूळे,दीपक शिंदे,वर्षा गुंडू,शिवाजी भोंडवे,मनोज हिरणवाळे आदी.(छाया -अमोल भांबरकर) 

दादा चौधरी यांच्या आदर्श जीवनाची व कार्याची प्रेरणा विद्यार्थ्यांनी घ्यावी -प्रा.शिरीष मोडक

 नगर( प्रतिनिधी संजय सावंत -) थोर स्वातंत्र्य सेनानी कै.दादा चौधरी यांनी अनाथ विदयार्थ्यांनी शिक्षण घ्यावे यासाठी राष्ट्रीय पाठशाळा व राष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना केली.दादा चौधरींनी प्रसंगी तुरुंगवास भोगला. सत्याग्रहाचे नेतृत्व केले.लोकमान्य व नवशक्ती वृत्तपत्राचे संपादन केले.शिक्षणासाठी त्यांची तळमळ होती.दादा चौधरी यांच्या आदर्श जीवनाची व कार्याची प्रेरणा विद्यार्थ्यांनी घ्यावी.असे प्रतिपादन हिंदसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक यांनी केले.

 हिंदसेवा मंडळाच्या दादा चौधरी विद्यालयातर्फे सेनापती कै.कृष्णाजी नरहर तथा दादा चौधरी यांची जयंती  उत्साहात साजरी करण्यात आली.राष्ट्रीय पाठशाळेतील दादा चौधरी यांच्या समाधीस्थळी हिंदसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी हिंदसेवा मंडळाचे कार्याध्यक्ष अजित बोरा,उपकार्याध्यक्ष डॉ.पारस कोठारी,दादा चौधरी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रा. मधुकर साबळे,सेवक प्रतिनिधी विठ्ठल ढगे,दादा चौधरी मराठी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष येवले,शिक्षक दीपक आरडे,अजय महाजन,नितीन केणे,विजय राहिंज,प्रसाद नंदे,दिनेश मूळे,दीपक शिंदे,वर्षा गुंडू,शिवाजी भोंडवे, मनोज हिरणवाळे आदी उपस्थित होते. अजित बोरा म्हणाले कि,थोर स्वातंत्र्यवीर सेनानी दादा चौधरी यांचे विचार विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असे आहे.दादा चौधरी विद्यालयात अनेक विद्यार्थी घडले आहेत.वंचित व दीनदुबळ्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कार्य अविरतपणे सुरु आहे.                                                                                      डॉ. पारस कोठारी म्हणाले कि,दादा चौधरी विद्यालयात शिक्षणासोबत संस्कार हि दिले जातात.महान पुरुषांचे जीवन कार्याची माहिती विद्यार्थ्यांना होते.स्वातंत्र्य सेनानी दादा चौधरी यांची शिक्षणासाठी खूप तळमळ होती.शाळेतील आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भाषणे केली.प्रास्तविक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रा.मधुकर साबळे यांनी केले.सूत्र संचालन मुख्याध्यापक सुभाष येवले यांनी केले तर आभार दीपक शिंदे यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.                                                                                                   

जाहिरात
Search
विडिओ
Recent News