शिर्डीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे कडून "कॉलेज खोलो" आंदोलन.


शिर्डीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे कडून "कॉलेज खोलो" आंदोलन.

शिर्डी, राजेंद्र दूनबळे, प्रतिनिधी

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आज संगमनेर महाविद्यालया व साईबाबा महाविद्यालय शिर्डी या महाविद्यालयासमोर जोरदार निदर्शने करून कॉलेज खोलो आंदोलन करण्यात आले. महाविद्यालये बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने अभाविपच्या वतीने आज राज्याव्यापी आंदोलन करण्यात आले.

शाळा चालू झाल्यात, बाजारपेठा चालू झाल्या, हॉटेल, बार चालू झाले परंतु महाविद्यालये कधी उघडणार असा प्रश्न या आंदोलनातून सरकार ला विचारण्यात आला.या प्रसंगी या आंदोलनात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला असून लवकरात लवकर कॉलेज उघडण्याची मागणी जोर धरून आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News