राष्ट्र-धर्मावरील आघात रोखणे आणि हिंदुराष्ट्राची स्थापना करणे, यांसाठी.. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ऑनलाईन हिंदु राष्ट्र-जागृती सभे चे आयोजन


राष्ट्र-धर्मावरील आघात रोखणे आणि हिंदुराष्ट्राची स्थापना करणे, यांसाठी..    हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ऑनलाईन हिंदु राष्ट्र-जागृती सभे चे आयोजन

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:

 राष्ट्र आणि धर्म यांवरील आघात रोखण्यासाठी विविध क्षेत्रांत कार्यरत असणार्‍या राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी हिंदूंचे संघटन ही काळाची आवश्यकता आहे. यासाठी तसेच राममंदिरासह आदर्श रामराज्य अर्थात हिंदु राष्ट्र- स्थापनेचा आवाज बुलंद करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने ऑनलाईन हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन केले आहे.  ही सभा 6 फेब्रुवारी या दिवशी सायं. 7 वाजता ऑनलाईन आरंभ होईल. या सभेला सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरू नंदकुमार जाधव, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आणि अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अन प्रवक्ता डॉ. विजय जंगम यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभणार आहे.

     हिंदु जनजागृती समिती हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अविरतपणे कार्यरत आहे. धर्मशिक्षण, धर्मजागृती, धर्मरक्षण, राष्ट्ररक्षण आणि हिंदूसंघटन ही समितीच्या कार्याची पंचसूत्री आहे. यासाठी समितीच्या वतीने हिंदु अधिवेशने, धर्मशिक्षणवर्ग, व्याख्याने, आंदोलने, सभा आदी उपक्रम राबवले जातात. यातून कृतीशील संघटन निर्माण होत आहे. या सभांमधून सर्वप्रथम दिला गेलेला धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापनेचा नारा आता देशव्यापी झाला आहे.

    ऑनलाईन होणाऱ्या या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत अधिकाधिक राष्ट्र आणि धर्मप्रेमी हिंदूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने केले आहे.

  मराठी  भाषेतील ऑनलाईन हिंदु राष्ट्र-जागृती सभा 6 फेब्रुवारीला सायं 7 वाजता होणार असून ही सभा FaceBook आणि YouTube द्वारे पहाता येईल. त्याच्या लिंक्स पुढीलप्रमाणे :

जाहिरात
Search
विडिओ
Recent News