कामगार संघटनांच्या वतीने बुधवारी राष्ट्रीय निषेध दिन


कामगार संघटनांच्या वतीने बुधवारी राष्ट्रीय निषेध दिन

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:

पिंपरी, पुणे (दि. 2 फेब्रुवारी 2021) भाजपा प्रणित केंद्र सरकारने मागील संसदिय अधिवेशनात हुकूमशाही पध्दतीने कामगार कायदे मंजूर करुन देशभरातील कामगारांवर अन्याय केला आहे. प्रचलित कामगार कायदे रद्द केल्यामुळे पुढील काळात कामगार क्षेत्रात कायमस्वरुपी अस्थिरता येऊन उद्योग क्षेत्र हे मुठभर भांडवलदारांच्या ताब्यात जाणार आहे. या नविन अन्यायकारक कामगार कायद्यांमुळे सर्व क्षेत्रातील संघटीत, असंघटीत कामगारांचे सामाजिक, आर्थिक शोषण होईल. यातून सामाजिक उद्रेक होण्याची जास्त भिती आहे. या सर्व बाबींचा विचार केंद्र सरकारने करावा आणि सुधारीत कामगार कायदे रद्द करुन प्रचलित कामगार कायद्यांचीच अंमलबजावणी करावी. या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी (दि. 3 फेब्रुवारी 2021) देशभरातील सर्व क्षेत्रातील कामगार संघटना राष्ट्रीय निषेध दिन म्हणून निदर्शने करणार आहेत.

      त्या अंतर्गत कामगार संघटना संयुक्त कृती समिती, पुणे च्या वतीने समितीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड, पुणे, चाकण, रांजणगाव, बारामती, जेजूरी या औद्योगिक परिसरात ‘ कामगार कायद्यांच्या आदेशाची होळी’ करणार आहेत. बुधवारी (दि. 3 फेब्रुवारी 2021) सकाळी 11 वाजता. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात कामगार कायद्याच्या आदेशाचे होळी करुन राष्ट्रीय निषेध दिनाच्या आंदोलनास सुरुवात होणार आहे. यावेळी ज्येष्ठ कामगार नेते डॉ. अजित अभ्यंकर, डॉ. रघुनाथ कुचिक, अनिल रोहम, मानव कांबळे, मारुती भापकर, डॉ. सुरेश बेरी, दिलीप पवार, किशोर ढोकळे, अर्जून चव्हाण, वसंत पवार, मनोहर गडेकर, अरुण बो-हाडे, नीरज कडू, इरफान सय्यद, एस. जी. सुळके, नितीन अकोटकर, अजय गायकवाड, चंद्रकांत तिवारी, विश्वास जाधव, गणेश दराडे, रघुनाथ ससाणे आदी उपस्थित राहणार आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News