चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड पा. यांचा अभिष्टचिंतन सोहोळा


चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड पा. यांचा अभिष्टचिंतन सोहोळा

राहुरी फॅक्टरी प्रतिनिधी विजय भोसले:

समाजाचा विश्वास संपादन केल्यास माणूस नेहमी यशस्वी होत असतो गणेश भांड यांनी आपल्या कर्तृत्वातून हे सिद्ध करून दाखवले आहे त्यांनी त्यांचे आयुष्य नेहमी मित्रांसाठी घालवले आहे अशी माणसे समाजाला ऊर्जा देण्याचे काम करतात असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री व शिवसेना उपनेते बबनराव घोलप यांनी केले आहे.

याबाबत चैतन्य उद्योगसमूहाचे अध्यक्ष गणेश भांड यांच्या वाढदिवसानिमित्त गुहा येथील गंगाधर बाबा छात्रालय येथे अभिष्टचिंतन सोहळ्याच्या आयोजन राज्याचे माजी मंत्री बबनराव घोलप व माजी न्यायाधीश बी जी कोळसे यांच्या शुभहस्ते तसेच 

म्हाडाचे नाशिक विभागाचे अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता या वेळी मराठा महासंघाचे प्रदेश अध्यक्ष संभाजीराजे दहातोंडे कामगार नेते जयंत गाडेकर साई आदर्श मल्टीस्टेट चे चेअरमन शिवाजीराव कपाळे,  बाळासाहेब भांड, शनेश्वर देवस्थान ट्रस्टचे सयाराम बानकर, ह भ प उंडे महाराज, सतीश मते ,अशोक पोर्जे, विजय पोर्जे, सुरेश जाधव ,भाऊसाहेब धोंगडे ,नंदू गोसावी, सादिक शिलेदार, संतोष चोळके ,विष्णू गीते ,रामचंद्र काळे आदींसह मान्यवर उपस्थित होते .


यावेळी बोलताना माजी मंत्री बबनराव घोलप यांनी सांगितले की , गणेश भांड यांनी व्यवसायाबरोबरच राजकारणात देखील पुढे जावे अशी आमची इच्छा आहे.सर्वांनी मित्र बनवावा असा हा माणूस आहे समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो  या हेतूने त्यांनी समाजातील वंचित लोकांना नेहमी सहकारी केले आहे .त्यांच्या कार्यातून ऊर्जा निर्माण होते हा माणूस समाजाला ऊर्जा देऊन जाणारी आहे त्यांना समाजाच्या हितासाठी उदंड आयुष्य मिळावे.


यावेळी बोलताना माजी न्यायाधीश बी.जी.कोळसे पाटील यांनी सांगितले की , माणसाने माणसासारखे वागले तर कोणीही वंचित राहणार नाही. मिळालेला जन्म कसा घालवायचा हे आपण ठरवायचे असते. समाजाचे आहे ते आपण समाजाला दिले पाहिजे. गणेश भांड यांनी समाजाचे दायित्व  स्वीकारून समाजाचा विश्वास संपादन केलेला आहे त्यामुळेच त्यांच्या हातून चांगले काम होत आहे .मोठे व्हायला राजकारणच केले पाहिजे असे नाही. समाज योग्य काम केल्यास आपल्याला मोठे करत असतो हे आपण ध्यानात ठेवले पाहिजे गणेश ने चांगले काम केल्यामुळे त्यांना हे मोठेपण मिळत आहे.

यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष व म्हाडा चे नाशिक विभागाचे अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांनी सांगितले की, आपल्या उत्पन्नातील काही वाटा वंचितांना द्यावा. हे मानसिकता असणारे लोक कमी आहेत मात्र गणेश भांड यांनी नेहमी समाजातील गरजू व वंचित लोकांना आर्थिक मदत केलेली आहे मोठ्या मनाची माणसे प्रगती करतात हे त्यांनी सिद्ध केले आहे. हजारो युवकांच्या हाताला त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. गोरगरिबांच्या हक्काची लढाई करत असताना त्यांनी आम्हाला मोलाची साथ दिलेली आहे.

 कामगार नेते जयंत गाडेकर ,मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजीराजे दहातोंडे यांचीही भाषणे झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गणेश भांड यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार रफिक शेख यांनी केले तर आभार श्रीकांत जाधव यांनी मानले.

‌ दिवसभरात गणेश भांड यांना आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, तालुकाध्यक्ष विलास साळवे,अतुल त्रिभुवन,राहुरी कारखान्याच्या वतीने कार्यकारी अधिकारी बी. एन.सरोदे राहुरी अर्बन निधीचे चेअरमन रामभाऊ काळे, आप्पासाहेब ढुस, पवन मेवाडा, मदन मेवाडा कारखान्याचे माजी संचालक द्वारकानाथ बडदे, प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे संचालक संजय आहेर ,सुधाकर आहेर सचिन आहेर , ज्येष्ठ नेते चंद्रकांत म्हस्के , यशवंत फोपसे, निलेश म्हस्के, प्राचार्य लक्ष्मण शिरसागर, निलेश म्हस्के, नितीन आढाव, अशोक शेटे, काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष बाळासाहेब खांदे, महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळाचे जिल्हाध्यक्ष अशोक काळे ,सचिव बाळासाहेब पाचरणे, सहसचिव सुनील भुजाडी ,ॲड गोरक्षनाथ रसाळ,दीपक त्रिभुवन आदींनी शुभेच्छा दिल्या . सकाळपासून संध्याकाळपर्यंत विविध व्यक्ती संघटना, व्यवसायिक मित्र, उद्योजक राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांनी भांड यांचा सन्मान केला.

केंद्रीय मंत्री व आरपीआयचे सर्वेसर्वा रामदासजी आठवले साहेब यांनी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्या भ्रमणध्वनीवरून गणेश भांड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या,

आमदार निलेश लंके सध्या वैष्णवदेवी यात्रेसाठी गेलेले आहेत त्यांनी व्हिडिओ द्वारे गणेश भांड यांना शुभेच्छा व्यक्त करत उदंड आयुष्यासाठी वैष्णव देवी माते कडेमातेकडे प्रार्थना करणार असल्याचे सांगितले

देवळाली प्रवरा येथील चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेशदादा भांड यांना राहुरी सायकलिंग अँड ट्रेकिंग क्लब चे अध्यक्ष अरुण ताकटे, सदस्य कडूबा इंगळे, गोरख मेहेत्रे, ज्ञानेश्वर पोपळघट, सोन्याबापू जगधने, प्रीतम बोरा, नितीन शहाणे, सुनील शिंदे, दीपक मेहेत्रे, आरिफ इनामदार, गिरीश सुराणा, ओंकार दरक, अनिल निकम, डॉ. अंगराज पवार, प्रदीप तनपुरे, शंतनू हरीश्चंद्रे, रमेश नालकर आदींनी शाल श्रीफळ व पुष्पहार घालून शुभेच्छा दिल्या.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News