राहूरी फॅक्टरी येथील नाभिक एकता महासंघाच्यावतीने नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान


राहूरी फॅक्टरी येथील नाभिक एकता महासंघाच्यावतीने नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान

राहूरी फॅक्टरी, महाराष्ट्रभुमी प्रतिनिधी

राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे नाभिक एकता महासंघाच्यावतीने विविध ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून नाभिक समाजातील बांधवांचा व विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिचा गौरव समारंभ पार पडला.

याप्रसंगी नाभिक एकता महासंघाचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष किरणराव बिडवे, महासंघाचे तालुका अध्यक्ष पत्रकार  आनिल वाघचौरे तसेच उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष मनोज वाघ, महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष अलका वाघमारे,   कल्याण राऊत, भाऊसाहेब बिडवे ,आनिल बिडे, बाबा बिडे, बापूसाहेब दुधाडे, मयुर राधाकिसन दुधाडे, सरोज तुपे, किशोर बिडवे, संजय जाधव, बाळासाहेब वाघ, दिलीप विळसकर,अशोकराव कोरडे, संजय जाईबाहार,  महाराष्ट्र राज्य संघटक  सुनिल विश्वासराव, कार्यध्याक्ष चांगदेव पवळे,आदिनाथ मदने,   हनुमंतराव कोरडे, लक्ष्मीकांत  कोरडे तसेच कणगर, गुहा, केलवड, लोणी ,ताहाराबाद, संगमनेर श्रीरामपूर, राहाता, तांभेरे , कात्रड मांजरी , शिर्डी वांबोरी,  राजापूर गावातील नाभिक बांधव व सर्व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.या  समारंभात सुनिता सोमनाथ कोरडे (लोणी), कमल आप्पासाहेब हुडे (तांभरे) ,हिराबाई दिपक चव्हाण (उककडगावदेवीचे कोपरगाव), जगन्नाथ कृष्णाजी सोनवणे (एकरुखे) आदींसह तृप्ती विश्वासराव आदी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य तसेच शुभम कोरडे यांनी नीट परीक्षेत उज्वल यश मिळविले त्याबद्दल सन्मान करण्यात आला.  राहूरी फॅक्टरी येथील नाभीक समाज बांधवाच्या पालक व पाल्याला शिक्षण संस्थेने दिलेल्या त्रासानंतर खंबीरपणे पाठीशी उभे राहून न्याय मिळवून दिल्याबद्दल नगरसेवक आदिनाथ कराळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

 राहुरी फॅक्टरी येथील नवनिर्वाचित अध्यक्ष विजय चंद्रकांत सोनवणे, उपध्यक्ष, सचिन वाघमारे, सलुन आसोशियनचे अध्यक्ष महेश बिडवे, उपध्याक्ष विकास साळुंखे यांना जिल्हा अध्यक्ष मनोज  वाघ यांच्या हस्ते पत्र देऊन सत्कार करण्यात आला. सलुन आसोशियनचे अध्यक्ष महेश बिडवे यानी आभार मानले .या कार्यक्रमास आनिल वाघमारे ,गंगाधर पवळे, संदिप साळुंखे,  बबलू गायकवाड, महेश पवळे, आभिजित आहेर ,उद्धव राऊत, विश्वनाथ राऊत ,सुदाम पवळे, दत्तात्रय राऊत ,भागवत कोरडे, प्रकाश दुधाडे ,वेदांत विश्वासराव, तुषार राऊत, रवी राऊत, दादा दुधाडे, श्रीकांत अनारसे, नितीन सोनवणे ,सोमनाथ आहेर आदी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News