संजय गांधी निराधार योजनेची 80 प्रकरणे मंजूर


संजय गांधी निराधार योजनेची  80 प्रकरणे मंजूर

बारामती : बारामती (काशिनाथ पिंगळे)

संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थी निवड सभा 29 जानेवारी 2021 रोजी  तहसिल कार्यालय, प्रशासकीय भवन, बारामती येथे तहसिलदार विजय पाटील, संजय गांधी योजनेचे नायब तहसिलदार महादेव भोसले, शासकीय सदस्य व कर्मचारी यांचे उपस्थितीत पार पडली .

सभेमध्ये एकूण 96 अर्जाची छाननी करण्यात आली.  यामध्ये संजय गांधी योजनेचे  54 प्राप्त अर्जापैकी 50 मंजूर, तर 04 अर्ज नामंजूर करण्यात आले. श्रावणबाळ योजनेचे 36 प्राप्त अर्जापैकी  24 अर्ज मंजूर तर 12 अर्ज नामंजूर करण्यात आले. इंदिरा गांधी योजनेचे प्राप्‍त 01 अर्जापैकी 01 अर्ज मंजूर करण्‍यात आला. राष्ट्रीय कुटूंब योजनेचे 05 प्राप्त अर्जापैकी 05 अर्ज मंजूर करण्यात आले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News