दहा महिन्यानंतर जिल्हा व तालुका न्यायालय पुर्ववत सुरु!! पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या पाठपुराव्याला यश


दहा महिन्यानंतर जिल्हा व तालुका न्यायालय पुर्ववत सुरु!! पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या पाठपुराव्याला यश

न्यायदान प्रक्रियेत गती येण्यासाठी वर्चुअल कोर्ट संकल्पना स्विकारण्याची मागणी

 अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर दहा महिन्यानंतर अहमदनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील जिल्हा व तालुका स्तरावरील न्यायालय पुर्ववत सुरु झाले आहे. न्यायालयांचे कामकाज पुर्ववत व नियमीत सुरु होऊन कायद्याच्या राज्याची प्रचिती येण्याकरिता न्यायव्यवस्थेचा सत्यबोधी सुर्यनामा करण्याचा इशारा पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने देण्यात आला होता. संघटनेच्या या मागणीला यश आले असून, संघटनेने आपले आंदोलन मागे घेतले आहे. न्यायदान प्रक्रियेत गती येण्यासाठी जिल्हा व तालुका न्यायालयांनी वर्चुअल कोर्टची संकल्पना स्विकारुन नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची मागणी करण्यात आली असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली. कोरोनानंतर महाराष्ट्रातील जिल्हा व तालुका स्तरावरील न्यायालयात फक्त 10 टक्केच कामकाज सुरु होते. महत्त्वाची प्रकरणे जामीन व कोठडी संदर्भात फौजदारी प्रकरणे वगळून सर्व कामकाज ठप्प होते. मागील तीन महिन्यापासून सर्व व्यवहार, उद्योगधंदे आदी शासकीय कार्यालयांचे कामकाज सुरळीत सुरु झाले. जिल्हा व तालुकास्तरावरील न्यायालय शंभर टक्के

जाहिरात
Search
विडिओ
Recent News