मानव सुरक्षा संघाच्या वतीने समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देणार - अमोल राखपसरे


मानव सुरक्षा संघाच्या वतीने समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देणार - अमोल राखपसरे

शिर्डी, राजेंद्र दूनबळे,

राहता तालुक्यातील  शिर्डी येथे  मानव सुरक्षा सेवा संघाची  राष्ट्रीय कार्यकारिणीची पहिली बैठक आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रीय अध्यक्ष अमोल राखपसरे  यांनी सर्वांना मार्गदर्शन करत  अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आणि निर्भीड पणे काम करण्यासाठी मानव सुरक्षा संघाची स्थापना करण्यात आली असून  संघटना सदैव आपल्या सोबत राहील समाजातील कुठल्याही घटकांमध्ये  अन्याय  झाला असेल त्या ठिकाणी संघटनेचा पदाधिकारी जाऊन  अन्यायला वाचा निर्भीड पणे फोडेल आणि समाज घटकांना न्याय मिळून देईल  संघटना सर्व क्षेत्रात निःस्वार्थ व सेवाभावी काम करेल लवकरच प्रत्येक जिल्ह्यात  मानव सुरक्षा सेवा संघाची  ऍम्ब्युलन्स  रुग्णालयात रुग्णांसाठी कार्य करणार असल्याचे त्यांनी बोलतांना सांगितलय.अन्याय होणाऱ्या घटनांना  न्याय देण्यासाठी मानव सुरक्षा सेवा  संघ खंबीरपणे उभा  राहील हे देखील बोलताना व्यक्त केल आहे. बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांनी  आपण पदाची जबाबदारी घेतल्या नंतर संघटने साठी निर्भीड पणे  काम करू असे आश्वासन दिले. या बैठकीसाठी  राष्ट्रीय अध्यक्षअमोल  राखपसरे राष्ट्रीय महासचिव भारत म्हसे , राष्ट्रीय प्रवक्ते विकास  गायकवाड , राष्ट्रीय प्रवक्ते भास्करजी चकोर  तसेच जेष्ठ पत्रकार  राजेंद्र साळवे साहेब अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष कुणाल जमदाडे  जिल्हा सचिव अजित गाढे  हे सर्व राष्ट्रीय पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी  उपस्थित होते यांच्या हस्ते  अहमदनगर जिल्ह्यातील विविध पदाधिकार्यांच्या  नियुक्त्या  करण्यात आल्या . अहमदनगर जिल्हाध्यक्ष म्हणून विनोद लक्ष्मण गायकवाड जिल्हा संपर्क म्हणून दत्तात्रय चांगदेव सोनवणे जिल्हा संघटक म्हणून अजिंक्य कराळे डॉक्टर रहेमान खाटीक उत्तर महाराष्ट्र संघटक यांची निवड करण्यात आली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News