मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महोत्सव समितीच्या समाजभूषण पुरस्काराने सुवर्णा डंबाळे यांचा गौरव


मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महोत्सव समितीच्या समाजभूषण पुरस्काराने सुवर्णा डंबाळे यांचा गौरव

आंबेडकरी चळवळीत महिला भगिनींचे योगदान महत्वपुर्ण.....केंद्रीय मंत्री रामदास आठवले

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:

पिंपरी (दि. 1 फेब्रुवारी 2021) भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या "शिका, संघर्ष करा, संघटीत व्हा." या मार्गाने स्वातंत्र्यपुर्व आणि स्वातंत्र्यानंतर आपल्या हक्कांसाठी लढणा-या आंबेडकरी चळवळीत महिला भगिनींचे योगदान महत्वपुर्ण आहे असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केले.

     केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते रिपब्लिकन युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा सुवर्णा डंबाळे यांना "समाज भूषण" पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. नवी मुंबई, एमटीडीसी रेसिडेन्सी येथे झालेल्या कार्यक्रमात यावेळी महोत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत जगताप, माजी मंत्री व ज्येष्ठ रिपब्लिकन नेते अविनाश महातेकर, ज्येष्ठ नेते अर्जुन डांगळे, रिपब्लिकन पक्षाच्या महिला अध्यक्षा सीमाताई आठवले आदींसह आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नवी मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महोत्सव समितीच्या वतीने दरवर्षी चळवळीत निस्पृहपणे काम करणा-या कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात येत.

      केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यावेळी आपला वडाळा कॉलेज ते केंद्रीय मंत्रीमंडळात मंत्रीपद हा प्रवास सांगितला. आठवले म्हणाले की, मी ज्यावेळी मुंबईत वडाळा कॉलेजला होतो. त्यावेळी माझ्याकडे हजार रुपये देखील नव्हते. परंतू मी कार्यकर्ता म्हणून समाजातील उपेक्षित घटकांचे प्रश्न घेऊन, वेळोवेळी रस्त्यावर उतरुन आंदोलन, उपोषण केले. वेळप्रसंगी तुरुंगवास भोगला. ज्या ज्यावेळी नैराश्य आले त्यावेळी मी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके वाचत असे, यातून आलेल्या संकटावर मात करण्यासाठी व लढा आणखी तीव्र करण्यासाठी मला प्रेरणा मिळायची. कार्यकर्त्यांनी कार्यातून पत व प्रतिष्ठा मिळवावी पद आपोआपच मिळते. आपण केलेल्या कार्याची दखल समाज, विविध सामाजिक संस्था, संघटना घेत असतात. सुवर्णा डंबाळे यांनी विद्यार्थीदशेपासून चळवळीत काम केले आहे. मागील तीन वर्षात त्यांचे काम नजरेत भरण्यासारखे आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर महोत्सव समितीने त्यांना "समाज भूषण" पुरस्कार दिला आहे. या पुरस्कारामुळे त्या आणखी जबाबदारीने काम करतील. त्यांच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा ही रामदास आठवले यांनी दिल्या.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News