ना.राजश्रीताई घुले यांचे माध्यमातून भैरवनाथ मंदिरास "क" वर्ग दर्जा प्रदान


ना.राजश्रीताई घुले यांचे माध्यमातून भैरवनाथ मंदिरास "क" वर्ग दर्जा प्रदान

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण

अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या  नियोजन भवनात पार पडलेल्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे उपस्थितीत पार पडलेल्या जिल्हा नियोजन बैठकीत  शेवगाव तालुक्यातील आमरापूर येथील भैरवनाथ मंदिरास नामदार राजश्रीताई चंद्रशेखर घुले पाटील यांचे माध्यमातून "क" वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा प्रदान करण्यात आला नामदार राजश्रीताई घुले पाटील यांनी वेळोवेळी श्री क्षेत्र भैरवनाथ मंदिरास क वर्ग तिर्थक्षेत्रांत समावेश करण्यासाठी पाठपुरावा केला.आमरापूर येथील श्री क्षेत्र भैरवनाथ मंदिर हे पुरातन असून "क" वर्ग तीर्थ क्षेत्रात  समावेश झाल्याने विकासकामे मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.जिल्हा परिषद अध्यक्षा नामदार राजश्रीताई चंद्रशेखर घुले पाटील  यांचे माध्यमातून तिर्थक्षेत्रास भरीव स्वरूपाचा निधी प्राप्त करून भक्तनिवास,प्रसाधन गृह स्ट्रीट लाईट इत्यादी कामे करण्यात येतील असे सरपंच सौ संगीता विजय पोटफोडे व उपसरपंच शारदा अरुण बोरुडे यांनी सांगितले श्री क्षेत्र  मंदिर "क" वर्ग तीर्थक्षेत्रात समावेश  करण्यासाठी अरुण बोरुडे,यांनी विशेष परिश्रम घेतल्याचे सरपंच पोटफोडे यांनी सांगितले .क वर्ग तीर्थक्षेत्रात समावेश केल्याबद्दल सर्व ग्रामस्थानी नामदार राजश्रीताई घुले पाटील यांना धन्यवाद दिले आहेत

जाहिरात
Search
विडिओ
Recent News