कोनोशी येथील जिःपः शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत मास्क ची वाटप


कोनोशी येथील जिःपः शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत मास्क ची वाटप

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण:

संत भगवानबाबा जयंती निमित्त शेवगाव तालुक्यातील कोनोशी येथील जि.प. प्राथमिक शाळेतील प्राथमिक शिक्षक राजन पाटील ढोले यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना स्वखर्चाने मोफत मास्कचे वाटप केले. 

या वेळी मुख्याध्यापक बाबाासाहेब खेडकर, गोविंद रूपनर, शैलेश चातुर, ज्योती खेडकर आदी उपस्थित होते. या वेळी संत भगवानबाबा यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. विविध कल्पक व रचनात्मक शैक्षणिक उपक्रमांनी गुणवत्ता सुधार उपक्रमासाठी  अग्रेसर  शिक्षक राजन पाटील ढोले यांना सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही तसेच विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आलेले नसल्याने खबरदारी म्हणून मास्क वापरणे गरजेेचे आहे. त्यासाठी ढोले यांनी स्वखर्चाने विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप केले. ढोले यांच्या या उपक्रमाने विद्यार्थ्याचे चेहरे आनंदले. गटशिक्षणाधिकारी रामनाथ कराड, विस्तार अधिकारी शैलजा राऊळ , केंद्रप्रमुख प्रकाश लबडे यांनी या उपक्रमाचे  कौतुक केले.

---------------------------------------

जाहिरात
Search
विडिओ
Recent News