पोलिओ म्हणजे बाल पक्षाघात विषाणूंमुळे येणारा लुळेपणा हा बहुतकरून दोन वर्षाखालील मुलांना होतो.
काही गरीब देशांमध्ये हा रोग अजूनही टिकून आहे. भारताने मात्र लसीकरणाच्या माध्यमातून या रोगावर विजय मिळवला आहे. आपल्या पाच वर्षांखालील चिमुकल्यांना उद्या रविवारी (31 जानेवारी 2021) पोलिओचा डोस आवश्य द्या आणि भारताला पोलिओमुक्त राहायला मदत करा. लक्षात ठेवा, पोलिओ मुक्त आयुष्य हेच देशाचे भविष्य!