कौलेवाडीत जनाबाई कौले यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त सत्यशोधक वारकरी संघाच्या वतीने सत्यशोधक प्रवचनाचे आयोजन


कौलेवाडीत जनाबाई कौले यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त सत्यशोधक वारकरी संघाच्या वतीने सत्यशोधक प्रवचनाचे आयोजन

बारामती : प्रतिनिधी ,काशिनाथ पिंगळे

कौलेवाडी ता.बारामती याठिकाणी मा. जिल्हापरीषद सदस्य व सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वरबापू कौले यांच्या मातोश्री जनाबाई कौले यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त सत्यशोधक वारकरी संघाच्या वतीने सत्यशोधक प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. हे प्रवचन डॉ.जगताप यांनी केले तसेच या प्रवचनाचे नियोजन भाऊसो भागवत यांनी केले.

  या कार्यक्रमासाठी समाजाचा उस्फुर्त पाठिंबा मिळाला तसेच महिलांनी आणखी मार्गदर्शन करण्याची विनंती केली आणि  मा. सरपंच बी. आर. चौधरी म्हणाले समाजामध्ये अशा पद्धतीची प्रवचन किंवा कीर्तन निरंतर घडून आली पाहिजे अशा पद्धतीची मागणी करण्यात आली.

 मार्केट कमिटीचे मा. सदस्य पोपटराव खैरे, पुणे मार्केट कमिटीचे माजी चेअरमन दिलीपराव खैरे, उद्योजक काका कुतवळ, माजी सरपंच बी. आर. चौधरी, नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्य, व परिसरातील सर्व मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News