शेतकरी संरक्षण कायद्यासाठी बिगर शासकीय मसुदा समिती स्थापनेचा प्रस्ताव


शेतकरी संरक्षण कायद्यासाठी बिगर शासकीय मसुदा समिती स्थापनेचा प्रस्ताव

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदचा पुढाकार

समितीत पद्मश्री पोपटराव पवार व पाटोद्याचे भास्करराव पेरे यांची कार्य करण्याची सहमती

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - देशात राष्ट्रीय शेतकरी संरक्षण कायदा आनण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली बिगर शासकीय मसुदा समिती स्थापनेसाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदने पुढाकार घेतला आहे. या मसुदा समितीत देशातील कृषी तज्ञ, प्रगतशील शेतकरी व शेतीचा सर्वांगीन अभ्यास असलेल्या व्यक्तीमत्वांचा समावेश केला जाणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.  

मागील दोन महिन्यापासून देशातील शेतकर्‍यांनी केंद्र सरकारने नव्याने पारीत केलेले तीन नवीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी दिल्ली येथे आंदोलन सुरु ठेवले आहे. प्रारंभी हे आंदोलन दडपण्यासाठी बळाचा वापर करण्यात आला. प्रजासत्ताकदिनी झालेल्या उग्र आंदोलनानंतर यामध्ये फुट पाडण्याचे प्रयत्न सुरु आहे. देशातील शेतकर्‍यांना प्रतिष्ठा मिळून त्यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी राष्ट्रीय शेतकरी संरक्षण कायदा क्रांतीकारक ठरणार आहे. शेतकरी या संज्ञेत शेतकरी, शेतमजूर व शेतीमालावर प्रक्रिया करणारा स्वयंरोजगाराचा या कायद्याने संरक्षण मिळणार आहे. देशातील प्रत्येक राज्यांनी व केंद्र सरकारने कृषी अंदाजपत्रक वेगळे सादर करावे, जलसंधारण, ठिबक सिंचन, सिंचन पाणी वाटपाची हमी मिळावी, शेतीमालाला उत्पादन खर्चाशी सुसंगत बाजारभाव मिळणे, सरकारचे नियंत्रण नसलेला कृषीमुल्य आयोग स्थापन होणे, नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी शेतकर्यांना विमा संरक्षण, शेतात जाण्यासाठी रस्ते, प्रत्येक जिल्ह्यात शेतकरी संरक्षण न्यायप्राधिकरणची नेमणुक होणे, शेतकर्यांची फसवणुक करणार्यांवर फौजदारी कारवाई होऊन आरोपींना जेलमध्ये टाकण्या संदर्भातच्या तरतुदी या मसुद्यात समाविष्ट करुन समिती मधील तज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. 

या मसुदा समितीत आदर्श गाव संकल्प व कार्य समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार, पाटोदा (जि. औरंगाबाद) येथील भास्करराव पेरे यांनी देखील संघटनेला या समितीत कार्य करण्याची सहमती दर्शवली आहे. शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी गट, तट विसरुन सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. या मसुदा समितीच्या माध्यमातून व्यापक कृषी मंथन करुन कृषी क्रांती घडविण्याचा संघटनेचा मानस असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी सांगितले. ही मसुदा समिती निर्माण करण्यासाठी कॉ.बाबा आरगडे, माजी कुलगुरु सर्जेराव निमसे, कॉ. महेबुब सय्यद, अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, जालिंदर बोरुडे, प्रकाश थोरात, वीरबहादूर प्रजापती, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्नशील

जाहिरात
Search
विडिओ
Recent News