जनशक्ती विकास आघाडी महात्मा गांधी पुण्यतिथी साजरी करण्यात आली शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण


जनशक्ती विकास आघाडी महात्मा गांधी पुण्यतिथी साजरी करण्यात आली  शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण

दि.(३०) भारतामध्ये असे काही व्यक्तिमत्व घडून गेले ज्यांनी जगावर आपल्या विचारांच गारूड घातलं. आजही त्यांनी आखून दिलेला मार्ग हा जगभर स्वीकारला जात आहे. असे प्रतिपादन जनशक्ती विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲड.शिवाजीराव काकडे यांनी शेवगाव येथे केले. जनशक्ती विकास आघाडीच्या वतीने शेवगाव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी कार्यक्रम घेण्यात आला यावेळी ते बोलत होते. यावेळी सौ.हर्षदाताई काकडे, सुरेश नाना चौधरी, संजय आंधळे, रामजी मडके, प्राचार्य भगत सर, बाळासाहेब उबाळे, अशोक वावरे, अशोक खुसमांडे, ऋषिकेश ढाकणे यांच्यासह जनशक्तीचे कार्यकर्ते, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी ॲड. काकडे पुढे म्हणाले की, आज महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आपण साजरी करत आहोत. हा देश राष्ट्रपिता महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस या थोर पुरुषांचा देश आहे. अशीच त्यांची ओळख आहे. आपल्या पुरते बोलायचे झाले तर, आपल्या संस्थेच्या नगर येथील छात्रालयात महात्मा गांधी यांनी भेट दिली होती. याची क्वचितच कुणाला माहिती असेल. त्या वेळेला त्यांनी एक वाक्य उच्चारले होते. “इस पाठशाला की छात्र बहुत तेज और बुद्धिमान है”  आणि दुसरे वाक्य असे सांगितले होते की, "अथांग समुद्रामध्ये दिपस्तंभ असावा अशा स्वरूपाचे या छात्रालयाचे काम आहे" अशा स्वरूपाची आपल्या छात्रालयावरील महात्मा गांधींजीची भेट ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आपल्याला अत्यंत स्मरणीय आहे. त्यांचे कार्य, विचार हे अजर-अमर राहतील. मी जनशक्ती विकास आघाडी, जनशक्ती उद्योग समूह आणि आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाच्या वतीने त्यांच्या पावन स्मृतीस पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करतो.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News