1 फेब्रुवारीपासून अपात्र शिधापत्रिकांची राज्य सरकारकडून होणार तपासणी!


1 फेब्रुवारीपासून अपात्र शिधापत्रिकांची राज्य सरकारकडून होणार तपासणी!

सर्वसामान्य जनतेला स्वस्त धान्य मिळावे यासाठी स्वस्त धान्याची दुकाने असतात. त्यासाठी शिधापत्रिकांचे वाटप सर्व लोकांमध्ये केले जाते. मात्र, अनेकदा या शिधा वाटपामध्ये अनियमितता किंवा गळती दिसून येते. या विरोधात कठोर पावले उचलण्याचे आता महाराष्ट्र राज्य सरकारने ठरवले आहेत. 

जे लोक शिधा पत्रिका बाळगण्यासाठी अपात्र असतील त्यावर योग्य ती कारवाई करण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे.  दोन महिने चालणाऱ्या या प्रक्रियेत केंद्र सरकारने घालून दिलेल्या प्रत्येक नियमांचे पालन केले जाणार आहे. येत्या 1 फेब्रुवारीपासून अपात्र शिधापत्रिका धारकांची शोध मोहीम राज्य हाती घेईल. त्यासाठी तलाठी आणि शासकीय कर्मचारी यांची मदत घेतली जाणार आहे.

                   राज्यभरात बीपीएल, अन्तोदय, केसरी अशा विविध प्रकारच्या कार्डच्या स्वरूपामधुन जवळपास 25 कोटी लोकांना या शिधापत्रिका दिल्या गेल्या आहेत.  या प्रत्येकाची तपासणी करून ज्या लोकांना योग्य तो पुरावा देता येईल ते लोक गट अ मध्ये, आणि ज्या लोकांना पुरावा देता येणार नाही ती लोकं गट-ब मध्ये घालून ही वर्गवारी करण्यात येणार आहे.


जाहिरात
Search
विडिओ
Recent News