कोरोना काळात फिनिक्स फाऊंडेशनने निस्वार्थपणे केलेली रुग्णसेवा कौतुकास्पद -खा.डॉ.सुजय विखे.. फाऊंडेशनचे अध्यक्ष बोरुडे यांचा सन्मान


कोरोना काळात फिनिक्स फाऊंडेशनने निस्वार्थपणे केलेली रुग्णसेवा कौतुकास्पद -खा.डॉ.सुजय विखे..  फाऊंडेशनचे अध्यक्ष बोरुडे यांचा सन्मान

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - कोरोना काळात माणुसकीच्या भावनेने फिनिक्स फाऊंडेशनने गरजू रुग्णांपर्यंत पोहचून त्यांची सेवा केली. मनुष्यरुपी रुग्णांची सेवा ही ईश्‍वरसेवाच आहे. फाऊंडेशनने निस्वार्थपणे केलेली रुग्णसेवा कौतुकास्पद असून, या कार्याची दखल घेऊन दिल्लीचा राष्ट्रीय अंधत्व निवारणचा पुरस्कार मिळणे हे जिल्ह्याच्या दृष्टीने भुषणावह असल्याचे प्रतिपादन खासदार सुजय विखे पाटील यांनी केले.

कोरोना महामारीत फिनिक्स सोशल फाऊंडेशनने विविध मोफत शिबीर घेऊन सर्वसामान्य रुग्णांना आधार दिल्याबद्दल व सदरच्या कार्याबद्दल दिल्ली येथील राष्ट्रीय अंधत्व निवारण समितीचा नेत्र सेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी खासदार डॉ. विखे बोलत होते. रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोरुडे यांचा खासदार डॉ. विखे व माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी माजी नगरसेवक अ‍ॅड. धनंजय जाधव, मितेश शहा, राहुल मुथा, तुषार अंबाडे आदी उपस्थित होते. शिवाजी कर्डिले म्हणाले की, टाळेबंदी काळात सर्वसामान्यांची व हातावर पोट असलेल्या कामगारांची आर्थिक परिस्थिती बिकट बनली असताना, गरजू रुग्णांची गरज ओळखून शहरासह ग्रामीण भागात मोठ्या धाडसाने फिनिक्स फाऊंडेशनने विविध शिबीरे घेतली. मागील आठ ते नऊ महिन्यात कोरोना काळात नियमांचे पालन करुन झालेल्या शिबीराचा तब्बल हजारो रुग्णांनी लाभ घेतला. तर अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या आहेत. गरजू रुग्णांची पैश्यांमुळे परवड होऊ नये, यासाठी गोर-गरीब रुग्णांकरिता फिनिक्स फाऊंडेशन आधार ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. 

अ‍ॅड. धनंजय जाधव यांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर टाळेबंदी काळात इतर उपचारासाठी नागरिकांना अनेक हॉस्पिटलमध्ये चकरा माराव्या लागल्या. तर कोरोनामुळे अनेक डॉक्टर रुग्णांना दवाखान्यात घेण्यास देखील घाबरत होते. टाळेबंदीमुळे आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने अनेक रुग्ण विविध आजाराच्या उपचारापासून वंचित होते. ही जाणीव ठेऊन फिनिक्सने नियमांचे पालन करुन विविध ठिकाणी आरोग्य शिबीर घेतले. गरजूंना मोफत चष्मे व औषधांचे वाटप केले. नागरिकांमध्ये कोरोनाबद्दल जनजागृती करुन त्याला प्रतिबंध करण्यासाठी आर्सेनिक गोळ्या, मास्क व सॅनीटायझरचे वाटप केल्याचे सांगितले. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News