श्रीराम मंदिरासाठी लघु उद्योजकांनी साडेतीन लाख रुपये निधी दिला


श्रीराम मंदिरासाठी लघु उद्योजकांनी साडेतीन लाख रुपये निधी दिला

   -नगर एमआयडीसी येथील 25 लघु उद्योजकांनी श्री राम मंदिरासाठी साडेतीन लाख रुपये निधी दिला.याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक डॉ.रवींद्र साताळकर,विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री विवेक कुलकर्णी,आळंदी येथील श्रीनिवास महाराज घुगे,अभियानाचे जिल्हा संयोजक गजेंद्र सोनवणे,विश्व हिंदू परिषदेचे कोषाध्यक्ष गणेश गवळी ,मुकुल गंधे,बजरंगदल जिल्हा संयोजक गौतम कराळे,उद्योजक मिलिंद कुलकर्णी,बाळकृष्ण नरवडे, पांडुरंग ढवळे,अजय अलग, संदीप कोद्रे,मारुती लेकुरवाळे,सुभाष वामनराव,संजय रीसे,जितेंद्र भळगट, गोपीनाथ गुंड,सतीश गवळी,राजू राऊत,मयूर गव

अयोध्येतील श्रीराम मंदिर राष्ट्र मंदिर स्वाभिमानाचे प्रतीक -विवेक कुलकर्णी                                                                                      नगर-(प्रतिनिधी संजय सावंत) जगात श्रीरामाचे अनेक सुंदर मंदिरे असताना अयोध्येतच का रामाचे मंदिर व्हावे.असे प्रश्न अनेक ठिकाणी विचारले जातात.अयोध्या ही श्रीरामाची जन्मभूमी आहे.कर्मभूमी प्रत्येकाची वेगवेगळी असते परंतु जन्मभूमी,जन्मगाव बदलत नाही तर तेच राहते.म्हणून श्रीरामाचे भव्य मंदिर अयोध्येत होत आहे. ४९२ वर्षाच्या संघर्षानंतर श्रीरामाचे मंदिर होत आहे.अनेक परकीय आक्रमणे झाली.76 लढाया झाल्या. ३ लाख रामभक्तानी बलिदान दिले.हिंदूंच्या मानबिंदूचे हनन करण्यासाठी अयोध्येतील श्रीराम मंदिर पाडण्यात आले.हा लढा परकीय विरुद्ध स्वकीय असा होता.श्रीराम हे राष्ट्रपुरुष आहेत.या देशातील संस्काराचा सर्वोच बिंदू श्रीराम आहे.या देशात कुठलीही संकल्पना रामराज्याशिवाय होऊ शकत नाही.म्हणून अयोध्येतील श्रीराम मंदिर राष्ट्र मंदिर स्वाभिमानाचे प्रतीक आहे.असे प्रतिपादन विश्वहिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री विवेक कुलकर्णी यांनी केले.    एमआयडीसी येथील चिंतामणी आर्ट गॅलरी येथे श्रीराम मंदिरासाठी बैठक घेण्यात आली.याप्रसंगी आळंदी येथील श्रीनिवास महाराज घुगे यांच्या हस्ते श्रीराम प्रतिमेचे पूजन करून पावती पुस्तकाचे पूजन करण्यात आले.अयोध्या येथील श्री राम जन्मभूमि तीर्थक्षेत्र येथे मंदिर निर्माण साठी निधी द्यावा.असे आवाहन विश्व हिंदू परिषद व राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे करण्यात आले होते.या आवाहनाला प्रतिसाद देऊन नगर एमआयडीसी येथील 25 लघु उद्योजकांनी साडेतीन लाख रुपये निधी श्री राम मंदिरासाठी दिला.याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री विवेक कुलकर्णी बोलत होते.यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक डॉ.रवींद्र साताळकर,आळंदी येथील श्रीनिवास महाराज घुगे,अभियानाचे जिल्हा संयोजक गजेंद्र सोनवणे,विश्व हिंदू परिषदेचे कोषाध्यक्ष गणेश गवळी ,मुकुल गंधे,बजरंगदल जिल्हा संयोजक गौतम कराळे,उद्योजक मिलिंद कुलकर्णी,बाळकृष्ण नरवडे, पांडुरंग ढवळे,अजय अलग,संदीप कोद्रे,मारुती लेकुरवाळे,सुभाष वामनराव,संजय रीसे,जितेंद्र भळगट, गोपीनाथ गुंड,सतीश गवळी,राजू राऊत,मयूर गवळी,सूनील गुंड, नागेश पवार,संदीप सरोदे,आदी उपस्थित होते.                                                     डॉ.रवींद्र साताळकर म्हणाले कि,प्रत्येकाच्या मनामनामध्ये राम भिनलेला आहे.श्रीरामाशिवाय जीवन पूर्ण होऊ शकत नाही.हिंदू धर्मात मनुष्य भेटल्यावर प्रथम राम राम असे म्हणतात.या श्रीरामाच्या मंदिरासाठी निधी देऊन श्रीराम मंदिर निर्माण कार्यात हातभार लावावा.असे आवाहन त्यांनी केले.                                                      आळंदी येथील श्रीनिवास महाराज घुगे म्हणाले कि,पूर्वजन्मीचे  पुण्य  म्हणून आपला निधी प्रभू श्रीराम दिरासाठी स्वीकारला आहे.रामायणातील प्रत्येक प्रसंगातून भक्ती,प्रेम,बंधुत्व,मातृपितृ भक्तीचे दर्शन घडते.या महासागरातून ठरण्यासाठी प्रत्येकाने श्रीराम सेवा करावी.श्रीरामाच्या आदर्श शिकवणीतून आचरण केल्यास जीवन सफल होईल.                                                                 यावेळी उद्योजक मिलिंद कुलकर्णी,बाळकृष्ण नरवडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्तविक गणेश गवळी यांनी केले तर आभार गजेंद्र सोनवणे यांनी मानले.                                  

जाहिरात
Search
विडिओ
Recent News