स्वच्छ विचार हे खेळाडू वृत्तीतून तयार होतात ! !स्वच्छतादूत सुशांत घोडके


स्वच्छ विचार हे खेळाडू वृत्तीतून तयार होतात ! !स्वच्छतादूत सुशांत घोडके

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

शिवसुत्र युवा प्रतिष्ठानचे वतीने जेऊर कुंभारी येथे क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ...

 प्रत्येकाचे जीवनात संघर्ष असतो मात्र आरोग्य हिताचे खेळ खेळणे गरजेचे असून त्यातून होणारी खेळाडू वृत्तीची जोपासना स्वच्छ विचारांना प्रेरीत करत असते.असे मनोगत सूर्यतेज संस्थापक व भारत सरकारचे स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी व्यक्त केले.

कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील हनुमान मंदिर ट्रस्ट मैदानावर शिवसुत्र युवा प्रतिष्ठान वतीने प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.यास्पर्धेचा शुभारंभ भारत सरकारचे स्वच्छतादूत व कोविड योध्दा सुशांत घोडके यांचे शुभहस्ते व प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.अनंतकुमार भांगे यांचे प्रमुख उपस्थितीत झाला.

शिवसुत्र युवा प्रतिष्ठानचे वतीने अनेक वर्षांपासून क्रिकेट सह विविध क्रीडा स्पर्धा आणि धार्मिक,सामाजिक उपक्रम राबविले जातात.

यावर्षीही क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.सुमारे ४०क्रिकेट संघांनी सहभाग घेतला आहे.

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानापासून कोपरगाव तालुक्यात स्वच्छतेसाठी वेगवेगळ्या संकल्पना राबवून पुर्णत्वास नेणारे,हजारो वृक्षांचे रोपण करून त्याचे पालकत्व स्वीकारलेले, कोरोना संकटात जनसामान्य लोकांच्या मदतीला योध्याप्रमाणेअहोरात्र धावलेले सुशांत घोडके आणि कोविड काळात आत्मा मालिक हाॅस्पिटलचे माध्यमातून बालकांना आरोग्य सेवा देणारे बालरोग तज्ञ डॉ.अनंतकुमार भांगे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

याप्रसंगी श्री.घोडके पुढे म्हणाले,खेळात प्रतिस्पर्धी कितीही चाणाक्ष आणि त्या समावेत सामावलेले ताकदवान असले तरी सर्वसामान्य प्रेक्षक बनून डोळसपणे पहात असलेली जनता आपलीही फलंदाजी त्याच उत्साहात पहात असते.अशा वेळी खरा कस लागतो.सर्वच खेळात जय-पराजय, मान-अपमान सुरु असतात. त्यामुळे खचुन नजाता प्रत्येक क्षण नव्या उमेदीने जगायला शिकले पाहिजे.लोकांचा मनात जागा निर्माण होईल असे काम नियमित करत रहावे. आजची तरुण पिढी गावांचे चित्र बदलू पहात आहे.हे बदलते चित्र स्विकारतांना गावाचे गावपण जपणेही महत्त्वाचे आहे.यातून उभे राहणारे काम इतरही गावांना प्रेरणा देतात.स्वच्छता, जलसमृद्धी याच बरोबर सांस्कृतिक वसा जोपासना व्हावी असे सांगितले.गावच्या सर्वांगीण प्रगती,शिवसुत्र युवा प्रतिष्ठान आणि क्रीकेट संघ यांना शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ.अनंतकुमार भांगे म्हणाले, गावातील लहानमुलांचे आरोग्य उत्तम ठेवायचे असेल तर त्याला मैदानी खेळ खेळू द्यावे.नियमित व संतुलित आहार चांगले आरोग्य ठेवतो.असे सांगितले.

या स्पर्धेकरिता प्रथम पारितोषिक २१ हजार कै. बाळासाहेब चंद्रभान पाटील गुरसळ यांच्या स्मरणार्थ, द्वितीय पारितोषिक ११ हजार श्री. धनराज दामोदर पाटील चव्हाण मेजर व चंद्रकांत रंगनाथ पाटील वक्ते यांचे तर्फे, तृतीय पारितोषिक ७ हजार श्री. भीमराज मच्छिंद्र वक्ते यांचे तर्फे, चतुर्थ पारितोषिक  ५ हजार हॉटेल स्वस्तिक यांचे तर्फे देण्यात येणार आहे.यासह विविध बक्षिसे देण्यात येणार आहे.

या प्रसंगी मेजर धनराज चव्हाण,ज्येष्ठ क्रीडापटू बाळासाहेब वक्ते यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

उद्घाटन समारंभास रंगनाथ शाहजी वक्ते,दिपक गायकवाड़, पाटिलबा वक्ते, भीमराज वक्ते, केशवराव होन, धोडिराम वक्ते, बापुराम वक्ते, जोगेश्वोरी इंटरनॅशनल स्कुल चे सचिव सुनिल होन , रावसाहेब होन ,कल्याण गुरसळ, तुषार गुरसळ, दादा वक्ते, पांडुरंग वक्ते, जालिदर चव्हाण , संजय भोंगळे, पोलिस पाटिल बाबासाहेब गायकवाड़, प्रदीप गायकवाड़,किशोर वक्ते, यशवंत आव्हाड,गोरख चव्हाण, पप्पू इंगले, संजय वक्ते, बाळासाहेब पवार, आकाश देवकर, शिवसूत्र युवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष सुधाकर वक्ते, उपाध्यक्ष विशाल गुरसळ, सदस्य राहुल वक्ते,  विकी चव्हाण , ऋषिकेश गुरसळ, अक्षय गुरसळ, कुलदीप वक्ते, राहुल देवकर , अर्थव गिरमे , नितीन देवकर , रोहीत जावळे ऋषिकेश मेहेत्रे ,व सर्व ग्रामस्थ जेऊर कुंभारी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News