सुरेगावात माझी वसुंधरा योजनेला प्रारंभ ! !


सुरेगावात माझी वसुंधरा योजनेला प्रारंभ ! !

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी    

   महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत असलेल्या माझी वसुंधरा अभियानात समावेश असलेल्या सुरेगाव गावात विविध मान्यवरांसह ग्रामस्थांनी आणि विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणासाठी हरित शपथ घेतली.

दरम्यान, पर्यावरण संरक्षण, स्वच्छ सुंदर परिसर, वृक्षलागवड, सौर ऊर्जेचा वापर, हरित कायद्याचे पालन आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करून माझी वसुंधरा अभियान यशस्वी करावे, असे आवाहन गटविकास अधिकारी मा. सूर्यवंशी  यांनी केले.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते  हरित शपथ घेण्यात आली. यावेळी सरपंच शशिकांत वाबळे, उपसरपंच मच्छिन्द्र हाळनोर,ग्रामविकास अधिकारी खेडकर, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी,विश्व्नाथ करिअर ऍकेडमी चे संस्थापक विश्व्नाथ जाधव, आशा सेविका, व अंगणवाडी सेविका आदींनी हरित शपथ घेण्यासाठी सहभाग घेतला व विश्व्नाथ करिअर अकॅडेमी आणि  आदींनी सुरेगाव मधील ग्रामपंचायत परिसर, शनी चौक, अंबिका नगर, व विविध ठिकाणी स्वछता केली.

महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या निर्णयानुसार पृथ्वी, वायू, जल, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत राबविण्यास सुरुवात झाली आहे. या अभियानात सुरेगाव ग्रामपंचायतीचा सहभाग असून वसुंधरेच्या प्रति आपली जबाबदारी म्हणून गावातील लोकप्रतिनिधींसह अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवत कोरोनाविषयक नियमांचे पालन करीत माझी वसुंधरा अभियांनांतर्गत पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने हरित शपथ घेतली. यामध्ये पर्यावरण संरक्षणाच्या सर्व नियमांचे पालन, मी माझे घर व परिसर स्वच्छ व सुंदर ठेवीन, घरातील ओला कचरा सुका कचरा प्लास्टिक कचरा यांचे वर्गीकरण करेन, मी उपलब्ध सर्व ठिकाणी वृक्षलागवड करेन व त्यांचे संगोपन करेन, पारंपरिक ऊर्जेचा वापर कमीत कमी करून सौरऊर्जेचा वापर करेन, घराच्या छतावरील पाणी जमिनीत मुरवून भूजलाच्या वाढीसमदत करेन, दैनंदिन जीवनामध्ये पर्यावरणपूरक साधनांचा वापर करेन, हरित कायद्याचे काटेकोरपणे पालन करेन, पर्यावरणास हानी पोहोचवणाऱ्या कामांना, व्यक्तींना वैधनिक मार्गाने विरोध करेन, माझे गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी वर्षातील शंभर तास स्वच्छतेसाठी देईन अशी शपथ घेतली.

डॉ.आबासाहेब पवार म्हणाले, निसर्गाशी असलेली कटीबद्धता निश्चित करण्यासाठी निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांवर पर्यावरण व वातावरणीय बदल तसेच जैवविविधतेचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी शाश्वत निसर्गपूरक जीवनपद्धती अवलंबण्याचा मार्ग म्हणून माझी वसुंधरा अभियान राबविले जात आहे. .

यावेळी सरपंच शशिकांत वाबळे म्हणाले, वृक्षारोपण, जलसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, निसर्गाचे संवर्धन, पर्यावरण सुधारणा व संरक्षण या मुद्यांवर प्रभावीपणे काम करुन सुरेगाव स्वछतेकडून समृद्धीकडे नेण्यासाठी माझी वसुंधरा अभियानात सर्वांनी सक्रिय सहभागी व्हावे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News