सायक्लोथॉन स्पर्धा शेवगावला उत्साहात संपन्न


सायक्लोथॉन स्पर्धा शेवगावला उत्साहात संपन्न

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण

शेवगाव तालुका मेडिकल असोशिएशनच्या वतीने शेवगाव ते आखेगाव अशी वीस किलोमीटर सायक्लॉथॉन सायकल स्पर्धा गुरूवारी ( दि. २८ ) पार पडली. या स्पर्धेत  पाच वर्षांच्या मुलांपासून ७५ वर्षांचे आजोबा सहभागी झाले होते. स्पर्धेत महिलांमध्ये डॉ. मनिषा लड्डा  तर पुरूषांमध्ये डॉ.सागर बैरागी यांनी प्रथम क्रमांक मिळविला.

शेवगाव तालुका मेडिकल असोसिएशचे अध्यक्ष डॉ. विकास बेडके , सेक्रेटरी डॉ. धिरज खुटवड यांच्या पुढाकाराने 

दैनंदिन जीवनात गावात सायकलला वापरण्यास प्रोत्साहन मिळावे. नवीन लोकांचा सायकल वापराकडे कल वाढावा, शारिरीक तंदुरूस्ती व पर्यावरण संवर्धनासाठी सायकलचा वापर वाढावा या उद्देशाने  या सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संयोजक डॉ संदीप बोडखे, डॉ संजय लढ्ढा, डॉ योगेश फुंदे, डॉ. मयुर लांडे, डॉ. दिपक वैद्य यांनी स्पर्धेचे संयोजन केले.

मुलांसाठी पाच किलोमीटर, ज्येष्ठांसाठी १० किलोमीटर तर खुल्या गटात २० किलोमीटर अशी सायकल स्पर्धा होती. रिशेप जीम व शिव फार्मा यांनी स्पर्धेचे प्रायोजकत्व स्विकारले होते. या स्पर्धेत मेडिकल असोशिएशनचे अनेक डॉक्टर्स व सदस्य सहभागी झाले होते.  विविध गटातील सायलिंग मधील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पुढीलप्रमाणे  खुला गट ( वीस किलोमीटर )  सायकलिंग स्पर्धेत पुरूष गटात - डॉ. सागर बैरागी,  डॉ.श्रीकांत देव्हढे, जगदिश कुलकर्णी, महिला ( २० किलोमीटर गट ) - डॉ. मनिषा लड्डा, ज्येष्ठ नागरिक पुरूष गट ( १० किलोमीटर ) -डॉ. प्रदिप उगले, धीरज लांडे, दीपक वैद्य, ज्येष्ठ नागरिक महिला गट - देहाडराय मॅडम, पाचरणे मॅडम, मुले-मली गट ( १० किमी ) - अथर्व बिहाणी, सोहम देहाडराय, रूचा चेके, मुले-मुली ५ किमी गट - अर्थव राठी, हिमांशू पाचरणे, चैताली बैरागी आदी.


 -----------------------------------------

जाहिरात
Search
विडिओ
Recent News