दौंड सरपंच वस्ती येथे पोलीस चौकी उभारण्याची नगरसेविका ज्योती राऊत तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल होले यांची मागणी


दौंड सरपंच वस्ती येथे पोलीस चौकी उभारण्याची नगरसेविका ज्योती राऊत तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल होले यांची मागणी

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:

गोपाळवाडी -- दौंड पोलीस येथे पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी नगरसेवक, पोलीस पाटील,नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष,सामाजिक कार्यकर्ते याची बैठक घेऊन मार्गदर्शन केले,यावेळी पोलीस अधीक्षक यांनी सर्वाना त्यांच्या परिसरातील माहिती विचारली त्यावेळी गोपाळवाडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल होले यांनी सांगितले की 1जानेवारी 2018 साली दौंड येथील हुल्लडबाज तरुणांनी गोपाळवाडी मध्ये येऊन  जेष्ठ नागरिकांना शिविगाळ करून बँकेवर दगड मारले होते,त्यावेळी गावातील तरुणांनी त्यांना अटकाव केला होता,तेव्हा वाद निर्माण होण्याची परिस्थिती झाली होती, परंतू दौंड मधील जेष्ठ कार्यकर्ते व गावातील जेष्ठांनी परिस्थिती हाताबाहेर जाऊ दिली नाही, तत्कालीन पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे यांनी पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांच्या मार्फत दोन्ही बाजूच्या व्यक्तींना समजावून सांगितले होते, परंतू तेव्हापासून गोपाळवाडी गाव संवेदनशील मध्ये आहे,परंतू गेल्या तीन वर्षात दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल नाही गावात शांतता व सुव्यवस्था आहे,गावात डिजे बंदी,फ्लेक्स बंदी,दारू विक्री व परवाना न देण्याबाबत ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला होता,पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांनी वेळोवेळी गावात भेट देऊन योग्य मार्गदर्शन केले होते,आणि पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनीही पहिली भेट आमच्या गावाला दिली आहे,त्यामुळे आमचे गाव संवेदनशील मधून मुक्त करण्याची विनंती विठ्ठल होले यांनी केली,तर नगरसेविका ज्योती अजय राऊत यांनी दौंड गोपाळवाडी रस्त्यावर वर्दळ वाढली असून तेथे रोज भाजी मंडई भरते,व्यवसायिक लोक वाढले आहेत,तेथे महिला रात्रीच्या वेळी महिला खरेदी साठी येत असतात त्यांच्या सुरक्षेसाठी तेथे दौंड पोलीस स्टेशन अंकित पोलीस चौकी उभारण्यात यावी मागणी केली आहे,पोलीस अधीक्षक यांनी लवकरच तुमच्या मागण्यांची पूर्तता करण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सर्वाना मोलाचे मार्गदर्शन केले आणि सर्वांचे आभार मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News