जाकिर शेख यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव


जाकिर शेख यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

अहमदनगर जिल्ह्यात प्रथमच दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित झालेले जाकीर हुसेन शेख यांचा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रिफ यांच्या हस्ते सत्कार करुन गौरव करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले आदि.

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत -) अहमदनगर जिल्ह्यात प्रथमच दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित झालेले जाकीर हुसेन शेख यांचा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रिफ यांच्या हस्ते सत्कार करुन गौरव करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले आदिंसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

     पालकमंत्री ना.हसन मुश्रिफ म्हणाले, जाकिर शेख यांनी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, चित्रपट अशा वेगवेगळ्या क्षेत्रात भरीव काम केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन देण्यात आलेला दादासाहेब फाळके पुरस्कार हा त्यांचा उचित सन्मान करणार आहे. अशा अष्टपैलू व्यक्तीमत्वाचे कार्य यापुढे असेच बहरत राहो, असे सांगून शुभेच्छा दिल्या.

     जाकिर शेख हे गेल्या अनेक वर्षांपासून विविध क्षेत्रात कार्यरत राहून वंचित घटकांसाठी काम करत आहेत. नगर जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले. त्याचप्रमाणे कोरोना काळातही गरजूंना मदत केली आहे. तसेच किंग फिल्म इंटरनॅशनल या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीशी जोडले गेले आहेत. त्यांच्या अशा विविध उपक्रमांमुळे त्यांना यापुर्वी त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News