कुंभारीचे सरपंच पद जिल्हाधिकाऱ्यांनकडून अपात्र


कुंभारीचे सरपंच पद जिल्हाधिकाऱ्यांनकडून अपात्र

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव तालुक्यातील कुंभारी गावचे लोकनियुक्त सरपंच प्रशांत एकनाथ घुले यांनी बेकायदेशीर रित्या शासकीय वनजमिनीवर अतिक्रमण केल्याने डॉ राजेंद्र भोसले जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी सरपंच पदावरून हकालपट्टी केली आहे.

सविस्तर वृत्त असे की कुंभारी गावचे सरपंच प्रशांत घुले यांच्या आजी पर्वतीबाई यांनी वनखात्याच्या गट नं ४३३ मध्ये अतिक्रमण केले असल्याची तक्रार दत्तू गजानन कदम व संजय चंद्रभान घुले यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे तक्रार केली असता सरपंच प्रशांत घुले यांनी ग्रामपंचायत विवाद अर्ज क्रं. ४४/२०१९ मध्ये दि १/१०/२०१९  रोजी पारीत केलेल्या निर्णया विरुध्द मा. अप्पर आयुक्त नाशिक यांचे कडे दाखल केलेल्या ग्रामपंचायत अपील अर्ज क्रं. ८०/२०१९ मध्ये दि. २/१२/२०१९ रोजी  पारीत झालेल्या निर्णयावर व्यथित होवुन मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांचे कडे दाखल

केलेल्या रिट याचिका क्रं. ६९/२०२० मध्ये मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांनी दि. १५/०१/२०२० रोजी पारीत केलेल्या निर्णयात नमुद केलेले आहे की, याचिका कर्ते प्रशांत एकनाथ घुले यांच्या आजी नामे पार्वतीबाई यांनी वनखात्याच्या गट नं. ४३३ मध्ये अतिक्रमण केलेले आहे. सदरचे अतिक्रमण  हे वनखात्याकडून दि. ६ सप्टेंबर २००२ रोजी केलेल्या पंचनामा हा आधार मानुन जिल्हाधिकारी यांनी दि. १/१०/२०१९ रोजी दिलेल्या निर्णयानुसार अपात्र ठरविणेत आलेले आहे.

या  सुनावणी वेळी अपीलार्थी यांच्या वकिलांनी  सदरचे मोजणी अहवालावर तोंडी हरकत घेऊन विवादीत गटाची मोजणी ही अधिकृत तज्ञ मोजणी अधिकाऱ्यांकडुन मोजणी करणे आवश्यक असल्याची मागणी केल्याने उपअधिक्षक भूमि अभिलेख, कोपरगांव यांना दि. २०/०८/२०२० रोजीचे पत्रानुसार या प्रकरणी मौजे-कुंभारी,ता.कोपरगांव येथिल गट नं. ४१२ व ४३३ ची संयुक्त मोजणी करुन अतिक्रमणाबाबत स्पष्ट अभिप्राय सादर करणे कामी कळविणेत आले. त्यानुसार उपअधिक्षक भुमि अभिलेख, कोपरगांव यांनी दि. १०/०९/२०२० रोजी संबधितांचे समक्ष इ.टी.एस. मशीनद्वारे मोजणी केली असता परंतु त्यात स्पष्ट अभिप्राय नोंदविलेले नसल्याने  अर्जदार यांनी सदर नकाशात गट नं. ४३३ मध्ये गट नं. ४१२ चे कब्जेदारांनी किती क्षेत्रात अतिक्रमण केले आहे. ते नकाशामधील समजुतीच्या टिपा सदरी नमुद करणेबाबत उपअधिक्षक भूमि अभिलेख,कोपरगांव यांना आदेश होणे बाबत विनंती करणेत येऊन  लेखी कारणे नमुद करुन हरकत घेणेत आलेली आहे. त्यानुसार उपवनसंरक्षक,अहमदनगर व उपअधिक्षक भुमि अभिलेख, कोपरगांव यांचे कडील वेगवेगळे अहवाल पहाता दोन्ही मध्ये विसंगती दिसुन येत असल्याने त्यांना विवादीत मोजणी संबधी एकत्रित अहवाल सादर करणे बाबत कळविले असता, उपवनसंरक्षक,अहमदनगर व उपअधिक्षक भूमि अभिलेख, कोपरगांव यांनी दि. . ०१/१२/२०२० रोजी सादर केलेल्या संयुक्त अहवालात वन विभागाकडुन दि. ६/०७/२०२० रोजी जी.पी.एस. व्दारे मौजे- कुंभारी ता,कोपरगांव येथिल राखीव वन गट नं. ४३३ ची हद्द निश्चिती केली होती. त्यावेळी सदर क्षेत्रा लगत गट नं. ४१२ चे धारकांने राखीव वन गट नं. ४३३ मध्ये ०.०६ आर एवढे क्षेत्र अतिक्रमण केले असल्याचे निदर्शनास आले होते. तसेच उप अधिक्षक भूमि अभिलेख,कोपरगांव कार्यालयाकडुन दि. १०/९/२०२० रोजी ईटीएस मशीनचे सहाय्याने गट नं. ४३३ व गट नं.४१२ ची मोजणी करणेत आली होती. त्यावेळी केलेल्या मोजणीतील क्षेत्र मोजणी नकाशात .०३ आर इतके दर्शविलेले आहे. असे नमुद केलेले असल्याचे दिसुन येते. तसेच उपअधिक्षक भूमि अभिलेख, कोपरगांव यांनी सुनावणीचे वेळी देखील असे तोंडी कथन केलेले आहे की, मौजे-कुंभारी, ता.कोपरगांव येथिल राखीष वन जमीन गट नं. ४३३ चे क्षेत्रावर लगतचे गट नं. ४१२ चे जमीन धारकांनी अतिक्रमण केलेले असल्याचे मोजणी समयी दिसुन आलेले आहे. अर्जदारा तर्फे दाखल केलेले लेखी हणणे च केलेला जादा लेखी युक्तीवादातील कथनासार मौजे- कुंभारी,ता.कोपरगांव येथिल गट नं. ४१५ चे धारक श्रीमती सुशिला चंद्रभान घुले, रा. कुंभारी यांनी ग.नं.४१५ चे हद कायम मोजणी कामी केलेल्या अर्जावरुन मो.र.नं. १५३१/२०१३ अन्वये उपअधिक्षक,भुमि अभिलेख, कोपरगांथ यांचे कार्यालया कडुन दि. १६/०८/२०१३ रोजी गट नं. ४१५ व लगतचे  गट नंबरची मोजणी करण्यांत आली सदर.  मोजणी बाबतचा मोजणी आलेख पहाता गट नं. ४१५ चे लगत गट नं. ४१२ यांची उत्तरेकडील उत्तर-पूर्व बाजुस गट नं. ४३३ मध्ये वहिवाट दिसुन येते. सदर नकाशाची प्रत प्रकरणी संलग्न आहे. मा. उपअधिक्षक,भुमि अभिलेख,कोपरगांव यांनी मा. कोर्टाचे आदेशावरुन बन विभागाचे ग.नं. ४३३ व सामनेवाले यांचा ग.नं. ४१२ ची . संयुक्त मोजणी केलेली आहे. त्यात गट नं. ४१२ चे उत्तरेकडील उत्तर-पुर्य बाजुस हिरव्या रंगाने दर्शविलेले क्षेत्र ०.०३ आर या जागेची समक्ष पहाणी करता सदर क्षेत्र है गट नं. ४३३ पैकी असुन ते क्षेत्र प्रथम दर्शनी गट नं. ४१२ मध्ये दिसुन येते. कारण गट नंबर ४१२ क्षेत्र व वादाकित क्षेत्र यात कोणताही बांध दिसुन येत नाही. असे स्पष्ट नमुद आहे. म्हणजेच सामनेवाले सरपंच  प्रशांत एकनाथ घुले यांचे एकत्र कुटुंबिय यांनी ० हे ०३ आर क्षेत्रात अतिक्रमण केलेले असल्याचे सदरचे दोनही अहवालात स्पष्टपणे नमुद करण्यात आलेले आहे. या सर्व निर्णयाचा आधार घेत डॉ राजेंद्र भोसले जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी प्रशांत एकनाथ घुले रा कुंभारी ता कोपरगाव हे ग्रामपंचायत अधिनियम कलम १४ (ज३) नुसार मौजे कुंभारी ता कोपरगाव या ग्रामपंचायतिच्या सरपंच पदावर राहण्यास अपात्र असल्याचे आदेश दिला आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News