मार्केट यार्ड येथील हनुमान मंदिरात पूजन करून श्री राम मंदिर निधी संकलन अभियानाचा शुभारंभ अयोध्येत श्रीराम मंदिर व्हावे हि जनसामान्यांची भावना-हेमंतराव हरारे


मार्केट यार्ड येथील हनुमान मंदिरात पूजन करून श्री राम मंदिर निधी संकलन अभियानाचा शुभारंभ अयोध्येत श्रीराम मंदिर व्हावे हि जनसामान्यांची भावना-हेमंतराव हरारे

 नगर(-प्रतिनिधी संजय सावंत) 500 वर्षाच्या संघर्षानंतर श्रीराम मंदिर निर्माणाचा मार्ग प्रशस्त झाला आहे.प्रभू श्रीराम हे राष्ट्रपुरुष होते.अयोध्येतील श्रीराम मंदिर जगाची सांस्कृतिक राजधानी होणार आहे.अयोध्येत श्रीरामाचे भव्यदिव्य मंदिर होत आहे या मंदिरासाठी सर्व रामभक्त घरोघरी जाऊन निधी संकलन करीत आहेत.श्री राम मंदिर हे राष्ट्र मंदिर होत आहे.राष्ट्राच्या उभारणीसाठी प्रत्येकाचे योगदान असावे.अयोध्येत श्रीराम मंदिर व्हावे हि जनसामान्यांची भावना आहे.असे प्रतिपादन रा.स्व.संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य हेमंतराव हरारे यांनी केले.              

               मार्केट यार्ड येथील हनुमान मंदिरात विधीवत पावती पुस्तकांचे पूजन पूजन करून श्री राम जन्मभूमि तीर्थक्षेत्र निधी संकलन अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.याप्रसंगी रा.स्व.संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य हेमंतराव हरारे बैठकीत बोलत होते.याप्रसंगी अभियानाचे मोठा निधी प्रमुख राजेश झंवर,    जिल्हा संयोजक गजेंद्र सोनवणे,जिल्हा सहसंयोजक अनिल रामदासी,महेंद्रभाई चंदे,संस्कार भारतीचे विलास बडवे,विश्व हिंदू परिषद शहरमंत्री श्रीकांत नांदापूरकर,अँड.हर्षल ठुबे,राजेंद्र चुंबळकर,अनिल राऊत,संजय महाराज महापुरे,विजयराव कोथंबिरे,किशोर गांधी,राजमल चंगेडिया,रमेश सोनी मंडलेचा,ललित गुगळे,प्रशांत गांधी,अमोल पोख्ररणा,दीपक बोथरा,संजय गुगळे,प्रणय चोरडिया,श्रीहरी बोरा,परितोष मुथा आदींसह व्यापारी मोठ्या संख्येनी उपस्थित होते

जाहिरात
Search
विडिओ
Recent News